शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

धक्कादायक! कोरोना संक्रमित वडिलांना रस्त्यातच सोडून पळाला मुलगा, मदतीसाठी ओरडत राहिली पत्नी; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:32 AM

परिसरातील लोकांचा दबाव वाढल्यानंतर त्याने सदर रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावली आणि वडिलांना उपचारासाठी पाठवले. या रुग्णवाहिकेत त्याची आई देखील होती. तर त्यांचा मुलगा आणि सून दुचाकीवर होते. यानंतर मुलगा काही सबब सांगून दुसरीकडे निघून गेला. यानंतर रुग्णवाहिका चालकही रुग्णाला रस्त्यातच सोडून निघून गेला. (Bihar)

मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपुर जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चक्क एक सरकारी शिक्षक मुलगा आपल्या कोरोनाग्रस्त वडिलांना रस्त्यातच सोडून पळाल्याची घटना घडली. तर, यावेळी सोबत असलेली त्याची आई पतीला वाचविण्यासाठी लोकांकडे जीवाच्या आकांताने मदतीची याचना करत होती. यानंतर कसे बसे रुग्ण वृद्धाला रुग्णालयात नेण्यात आले. पण, तेथे नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. (CoronaVirus son leaves corona infected father on road wife screams for help in Bihar)

ही घटना मुझफ्फरपूर शहरातील दमुचक भागात घडली. येथे राहणारे अर्जुन ओझ दोन दिवसांपूर्वीच कोरोना संक्रमित झाले होते. ते तेव्हापासून घरीच होते. त्यांचे कुटुंबीय त्यांना उपचारासाठी घेऊन जात नव्हते. त्यांचा मुलगा सरकारी शिक्षक आहे. परिसरातील लोकांचा दबाव वाढल्यानंतर त्याने सदर रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावली आणि वडिलांना उपचारासाठी पाठवले. या रुग्णवाहिकेत त्याची आई देखील होती. तर त्यांचा मुलगा आणि सून दुचाकीवर होते.

सबब सांगून फरार झाला मुलगा -यानंतर मुलगा काही सबब सांगून दुसरीकडे निघून गेला. यानंतर रुग्णवाहिका चालकही रुग्णाला रस्त्यातच सोडून निघून गेला. यानंतर सोबत असलेली पत्नी मदतीसाठी लोकांची याचना करत होती. ती मदतीसाठी आरडा-ओरड करत होती. मात्र, कुणीही मदतीसाठी समोर आले नाही. यानंतर कुणी तरी या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला.

या व्हायरल व्हिडिओची माहिती मुझफ्फरपूर डीएमपर्यंत पोहोचली. यानंतर त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना संबंधित रुग्णाला सदर रुग्णालयात भरती करण्याचे आदेश दिले. मात्र, तोवर त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. यामुळे येथील डॉक्टरांनी त्यांना एसकेएमसीएचला रेफर केले. मात्र, येथे कागदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच रुग्णाचा मृत्यू झाला. अर्जून ओझा असे या रुग्णाचे नाव. यानंतर पत्नीने सांगितले, की गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते उपचारासाठीच मुझफ्फरपूर येथे आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरBiharबिहार