शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
4
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
5
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
6
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
7
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
8
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
9
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
10
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
11
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
12
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
13
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
14
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
16
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
17
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
18
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
19
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
20
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का

coronavirus: रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरसाठी हाहाकार; सुप्रिटेंडेट डॉक्टर म्हणाले, "मला कार्यमुक्त करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 10:27 IST

coronavirus: कोविड-१९ रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असून, त्यामुळे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होण्याची भीती आहे

पाटणा - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. (coronavirus in India)अनेक भागात कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी लागणाऱ्या आवश्यक सामुग्रीची चणचण भासत आहे. बिहारमधील पटणा येथील रुग्णालयातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा (Shortage of oxygen cylinder) निर्माण होण्याची चिन्हे असल्याने कोविड-१९ रुग्णावर उपचार करणारे नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर विनोद कुमार सिंह यांनी आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांना पत्र लिहून आपल्याला कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. या पत्रात डॉ. सिंह यांनी कोविड-१९ रुग्णांच्या उपचारादरम्यान ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असून, त्यामुळे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होण्याची भीती आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. ( Shortage of oxygen cylinder in hospital; superintendent says, free me)

डॉक्टर सिंह म्हणतात की, ऑक्सिजन सिलेंडरच्या टंचाईमुळे जर कुठल्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याची सर्व जबाबदारी रुग्णालयातील मेडिकल सुप्रिटेंडेंट म्हणजे माझ्यावर येईल. त्यानंतर माझ्यावर कारवाई होईल. अशा परिस्थितीत तुम्ही मला या पदावरून कार्यमुक्त करावं. तसे झाल्यास मी तुमचा आयुष्यभर आभारी राहीन, असे त्यांनी आरोग्य सचिव प्रत्यय अमृत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला जेवढ्या संख्येने ऑक्सिजन सिलेंडर मिळाले पाहिजेत, तेवढ्या संख्येने ते मिळत नाही आहेत, त्याच्या जागी अन्य रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

दरम्यान, एनएमसीएचच्या मेडिकल सुप्रिटेंडेंट यांचे हे पत्र ट्विट करत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा नितीश कुमार यांचा छद्म विकास आहे. नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांनी ऑक्सिजनच्या टंचाईमुळे स्वत:ला कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यावरून तुम्ही परिस्थितीची कल्पना करा. १६ वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांकडून उत्तर मागण्याच मनाई आहे. ते १६ काय १६०० वर्षे मुख्यमंत्री राहतील तेव्हाही आपली चूक कबूल करणार नाहीत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलIndiaभारतBiharबिहारHealthआरोग्य