शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

coronavirus: दिलासादायक! कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरणार, एप्रिलअखेरीत तब्बल ४० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी विकसित होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 09:46 IST

coronavirus In India : पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने आलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेबाबत एका संशोधनामधून मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 

ठळक मुद्देक्रेडिट सुसेच्या एका संशोधनानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक ज्या गतीने बाधित होत आहेत. तितक्याच वेगाने ही लाट ओसरू शकतेएप्रिलच्या अखेरीपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित होतीलभारतात कोरोनाची दुसरी लाट वेळीच थोपवली गेली नाही तर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज १ हजार ७५० ते २ हजार ३२० मृत्यू होतील

नवी दिल्ली - सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत आहे.(coronavirus In India) पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने आलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. (CoronaVirus Positive News) मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेबाबत एका संशोधनामधून मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. (The second wave of coronavirus will recede rapidly, with antibodies developing in up to 40 percent of people by the end of April)

क्रेडिट सुसेच्या एका संशोधनानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक ज्या गतीने बाधित होत आहेत. तितक्याच वेगाने ही लाट ओसरू शकते, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे. तसेच एप्रिलच्या अखेरीपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित होतील, असा अंदाज या संशोधनामधून वर्तवण्यात आला आहे. 

या संशोधनामध्ये म्हटले आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशातील २१ टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित झालेली होती. एप्रिलच्या अखेरीच यामध्ये ७ टक्के लोकसंख्येची भर पडण्याची शक्यता आहे. तर लसीकरणाच्या माध्यमातून देशातील १२ टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील ४० टक्के लोकसंख्या ही कोरोनापासून मृत्यूच्या धोक्याबाहेर जाईल. एवढेच नाही तर २८ टक्के लोकसंख्येमध्ये संसर्गामुळे प्रतिकारशक्ती विकसित होई शकते. त्याशिवाय १२ टक्के लोक हे एप्रिलपर्यंत कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतील. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ८७ टक्के लोक हे ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे. दरम्यान, दुसरीकडे लँसेट कोविड-१९ आयोगाने भारतात कोरोनाची दुसरी लाट वेळीच थोपवली गेली नाही तर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज १ हजार ७५० ते २ हजार ३२० मृत्यू होतील, अशी भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसेल, असेही या अहवालात म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या