coronavirus : दारूची दुकाने सुरू झाल्याची अफवा, तळीरामांनी लावल्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:23 IST2020-04-01T16:23:27+5:302020-04-01T16:23:45+5:30
लॉकडाऊनमुळे दारूची दुकानेही बंद असल्याने मद्यपींची गैरसोय होत आहे. यांच्यापैकी अनेकजण कुठे दारूची व्यवस्था होते का?याची चाचपणी करत आहेत.

coronavirus : दारूची दुकाने सुरू झाल्याची अफवा, तळीरामांनी लावल्या रांगा
बंगळुरू - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरात जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यात दारूची दुकानेही बंद असल्याने मद्यपींची गैरसोय होत आहे. यांच्यापैकी अनेकजण कुठे दारूची व्यवस्था होते का?याची चाचपणी करत आहेत. अशाच काही तळीरामांना सरकार काही तासांसाठी दारूची दुकाने सुरू करणार असल्याची खबर कळली. त्यानंतर काय या मंडळींनी जवळ दिसेल त्या दारूच्या दुकानांसमोर रांगा लावल्या. पण ही अफवा असल्याचे समजताच या सगळ्यांचा भ्रमनिरास झाला.
ही घटना कर्नाटकातील गदग येथील आहे. येथे आज सकाळी सरकार दारूची दुकाने काही तासांसाठी उघडणार असल्याची वार्ता पसरली. गेल्या काही दिवसांपासून दारूचा घोट न मिळाल्याने घशाला कोरड पडलेल्या मद्यपीनी आसपासच्या दुकानासमोर गर्दी केली. अनेक ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या. मात्र ही केवळ अफवा असल्याचे समोर येताच तळीरामांचा भ्रमनिरास झाला.