शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVirus : मुकेश अंबानींनी तिजोरी उघडली; मोदींच्या फंडाला दिली कोट्यवधींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 20:56 IST

टाटा, महिंद्रासारख्या उद्योगपतींच्या पाठोपाठ कोरोनाच्या लढ्यासाठी रिलायन्स समूहानंही कोट्यवधींची रक्कम दिली होती.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1000हून अधिक झाली आहे. या जीवघेण्या रोगाशी लढण्यासाठी मोदींनीही PM Cares फंडाची घोषणा केली असून, अनेक जण या पीएम फंडाला सढळ हस्ते मदत करत आहेत. अदानींनी १०० कोटींची मदत दिली असून, रामदेव बाबांनीही २५ कोटी दिले आहेत. टाटा, महिंद्रासारख्या उद्योगपतींनीही कोरोनाच्या लढ्यासाठी कोट्यवधींची रक्कम दिली होती.आता रिलायन्स कंपनीचे  सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानींनी मोदींच्या पीएम फंडाला मदत करण्यासाठी तिजोरी उघडली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं मोदींनी सुरू केलेल्या अभियानात  योगदान देण्यासाठी ५०० कोटींचा निधी जाहीर केला आहे. तसेच रिलायन्सनं ५-५ कोटी अनुक्रमे गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. येत्या 10 दिवसात 5 लाख लोकांना जेवण दिले जाणार असल्याचंही रिलायन्सनं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स फाऊंडेशनने कोरोना रुग्णांसाठी सेव्हन हिल रुग्णालयात अवघ्या 2 आठवड्यात मुंबईत 100 बेडचं विलगीकरण कक्ष तयार केले होते. रिलायन्सदेखील 1 लाख मास्क आणि हजारो पीपीई वैयक्तिक संरक्षक उपकरणे तयार करीत आहे. जेणेकरून देशातील आरोग्य कर्मचार्‍यांना त्याचा फायदा होऊ शकेल. रिलायन्स आधीच आपत्कालीन वाहनांमध्ये विनामूल्य इंधन आणि डबल डेटा प्रदान करीत आहे.या निधीच्या घोषणेनंतर मुकेश अंबानी म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की, भारत कोरोनो विषाणूच्या आपत्तीवर लवकरात लवकर विजय मिळवेल." रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण टीम या संकटांच्या काळात देशासोबत आहे आणि कोरोनाविरुद्धचा हा लढा जिंकण्यासाठी शक्य तेवढी मदत करेल.  कोरोना साथीच्या लढाईसाठी जसे राष्ट्र एकसंध आहे, तसेच रिलायन्स फाउंडेशन आपल्या देशवासीय आणि स्त्रियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे, असंसुद्धा रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक सदस्य असलेल्या नीता अंबानींनी स्पष्ट केलं आहे. आमच्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी भारतात पहिले कोरोना समर्पित रुग्णालय स्थापन करण्यास मदत केली आहे. कोरोनाची तपासणी, चाचणी करण्यासह त्याला प्रतिबंध आणि उपचारात सरकारला सहकार्य करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचंही नीता अंबानींनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMukesh Ambaniमुकेश अंबानीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या