Coronavirus: शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:42 PM2022-02-04T21:42:29+5:302022-02-04T22:36:08+5:30

मुलांचे शिक्षणच नव्हे तर संपूर्ण विकासही शाळेत होतो. मागील २ वर्षापासून त्याचं खूप नुकसान झालं आहे.

Coronavirus: Resume school, children are not at high risk of coronavirus - WHO | Coronavirus: शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण

Coronavirus: शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण

Next

नवी दिल्ली – कोरोना संक्रमणाच्या भीतीनं शाळा बंद ठेवणं योग्य नाही. मागील २ वर्षांपासून मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकास बंद झाला आहे. मुलांना कोरोनापासून जितका धोका नाही तितका या गोष्टीमुळे आहे. शाळा बंद करण्याला प्राधान्य सर्वात शेवटी आलं पाहिजे आणि उघडण्याचं प्राधान्य सर्वात आधी हवं. २ वर्षाच्या कोरोना संक्रमणात लहान मुलं सर्वात कमी प्रभावित झाल्याचं विधान WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केले आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, जरी मुलं संक्रमित झाली तरी जास्त आजारी पडणार नाहीत. त्यामुळे आवश्यक काळजी घेत शाळा सुरु करायला हव्यात. शाळा सुरु करण्याबाबत सरकार आणि पालकांनी विचार करायला हवा कारण ओमायक्रॉन कोरोनाचा अखेरचा व्हेरिएंट नाही. भविष्यात कोरोनाचे आणखी व्हेरिएंट समोर येऊ शकतात. जर भविष्यात पुन्हा संक्रमण वाढले तर प्राधान्यक्रमे काय बंद करायला हवे याचा विचार करायला हवा असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मुलांचे शिक्षणच नव्हे तर संपूर्ण विकासही शाळेत होतो. मागील २ वर्षापासून त्याचं खूप नुकसान झालं आहे. हे खूप काळ सोसलेलं नुकसान आहे. त्यामुळे शक्य असेल त्या शाळा सुरु ठेवाव्यात असा सल्ला जगातील सर्व सरकारांना आहे. विना व्हॅक्सिनेशन मुलांना शाळेत पाठवणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न पालकांना पडतो. परंतु होय आपण पाठवू शकता. कारण गेल्या २ वर्षापासून संक्रमण पाहत आहोत त्यात मुलं संक्रमित झाले तरीही जास्त आजारी पडले नाहीत ही चांगली गोष्ट आहे. खूप कमी मुलं आहेत ज्यांना आधीपासून आजार आहे त्यांना धोकादायक आहे असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.

तसेच निरोगी सामान्य मुलांना कोरोनापासून धोका कमी आहे. मुलांना धोका आजारापासून नव्हे तर गेल्या २ वर्षापासून बौद्धिक विकास खुंटला आहे. त्याने जास्त आहे. शाळेत गेल्यामुळे काही संक्रमण होऊ शकतं परंतु त्यापासून वाचण्यासाठीच ६ वर्षावरील मुलांना मास्क परिधान करणं आवश्यक आहे असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus: Resume school, children are not at high risk of coronavirus - WHO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.