CoronaVirus: आशेचा किरण! काेराेनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 04:46 AM2021-04-18T04:46:40+5:302021-04-18T04:46:59+5:30

CoronaVirus: संशाेधन : एप्रिलअखेरीस ४०% लाेकांमध्ये ॲॅन्टिबाॅडी

CoronaVirus: A ray of hope! second wave will soon be over, says scintist | CoronaVirus: आशेचा किरण! काेराेनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार

CoronaVirus: आशेचा किरण! काेराेनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरराेज दाेन लाखांहून अधिक काेराेनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. त्यातच दुसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक बातमी आहे. देशाची चिंता वाढवणारी दुसरी लाट एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. एका संशाेधनातून ही माहिती समाेर आली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काेराेनाची रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली हाेती. मार्च आणि एप्रिलमध्ये दरराेजच्या नव्या रुग्णांमध्ये शेकडाे पटींनी वाढ झाली.

याबाबत ‘क्रेडिट सुसे’ या संस्थेने एक संशाेधन
केले.  काेराेनाची दुसरी लाट जेवढ्या वेगाने वाढली, तेवढ्याच वेगाने ती ओसरू लागेल, असा अंदाज या संशाेधनातून व्यक्त केला आहे. संशाेधनात असे म्हटले आहे, की गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरपर्यंत देशातील २१ टक्के लाेकांमध्ये प्रतिपिंड (ॲन्टिबाॅडी) विकसित झाले हाेते. तर एप्रिलमध्ये हा आकडा ४० टक्क्यांपर्यंत जाऊ शकताे. यात लसीकरणाचीही माेठी भूमिका राहणार आहे. यापैकी १२ टक्के लाेकांमध्ये एप्रिलच्या अखेरपर्यंत लसीकरणाच्या माध्यमातून राेगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली असेल, असा अंदाज आहे. परिणामी ४० टक्के लाेकसंख्येमध्ये काेराेनाविराेधात राेगप्रतिकार शक्ती निर्माण झालेली असेल. अशा स्थितीत दुसरी लाट झपाट्याने ओसरू लागेल.
दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये २४ हजारांपेक्षा अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. ऑक्सिजन आणि खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मुंबईत उच्चभ्रू इमारतींमध्ये रुग्ण
n    संशाेधनानुसार, दुसऱ्या लाटेत मुंबईत ९० टक्के रुग्ण उच्चभ्रू इमारतीतील आहेत. 
n    पहिल्या लाटेमध्ये या गटात केवळ १६ टक्के लाेकांमध्येच राेग्रप्रतिकारक शक्ती आढळून आली. 
n    त्या तुलनेत झाेपडपट्टीतील भागात ५७ टक्के लाेकांमध्ये प्रतिकार शक्ती आढळली हाेती. 
n    दुसऱ्या लाटेतही सर्व वयाेगटातील रुग्ण आढळून येत असल्याचेही निरीक्षण नाेंदविण्यात आले आहे. 

Web Title: CoronaVirus: A ray of hope! second wave will soon be over, says scintist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.