CoronaVirus News: मोदी सरकारच्या धोरणावर राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:27 IST2020-06-14T03:27:39+5:302020-06-14T03:27:53+5:30
तोच तो वेडेपणा पुन्हा केला जातोय; राहुल गांधींचं ट्विट

CoronaVirus News: मोदी सरकारच्या धोरणावर राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली : काही तरी नवे घडेल या आशेने तोच तो वेडेपणा पुन्हा केला जातोय, असे टष्ट्वीट करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना महामारी हाताळण्याच्या सरकारी धोरणावर शनिवारी टीका केली.
देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या चार टप्प्यांमध्ये कोरोना रुग्णांची व मृत्यूंची संख्या कशी सतत वाढत गेली हे दाखविणारे तक्तेही गांधी यांनी या टष्ट्वीटसोबत प्रसिद्ध केले. एका दिवसात सर्वाधिक ११,४५५ नवे रुग्ण व ३८६ मृत्यू होऊन शनिवारी भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाखांच्या पार गेल्यावर व मृतांचा आकडा ८८८४ वर पोहोचल्यावर गांधी यांनी हे नवे टष्ट्वीट केले. शुक्रवारी अशाच प्रकारे टष्ट्वीट करून त्यांनी म्हटले होते की, जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या रांगेत जाऊन बसण्याच्या स्पर्धेत भारताने उतरावे ही भयावह शोकांतिका आहे. उद्दामपणा व अकार्यक्षमता यामुळे हे घडत आहे.