शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

Coronavirus: पीएम केअर्स फंडाला 151 कोटी देऊ शकता; मग मजुरांकडून तिकिटाचे पैसे का घेता?- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 10:27 AM

रेल्वे मंत्रालय पीएम केअर फंडाला 151 कोटी रुपये देत आहे. ही गुंतागुंत जरा सोडवून द्या, असा टोलाही त्यांनी रेल्वे मंत्रालयाला हाणला आहे.  

ठळक मुद्देरेल्वेकडून विशेष ट्रेननं प्रवास करणाऱ्या या मजूर आणि कामगारांकडून तिकिटाचे पैसे आकारले जाणार आहेत. त्याच मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकीकडे सोनिया गांधींनी मजुरांच्या तिकिटाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केले असतानाच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मजुरांकडून तिकीट भाडे आकारत आहे, तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालय पीएम केअर फंडाला 151 कोटी रुपये देत आहे. ही गुंतागुंत जरा सोडवून द्या, असा टोलाही त्यांनी रेल्वे मंत्रालयाला हाणला आहे.  

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील मजूर आणि कामगारांना घरी परतण्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. रेल्वेकडून विशेष ट्रेननं प्रवास करणाऱ्या या मजूर आणि कामगारांकडून तिकिटाचे पैसे आकारले जाणार आहेत. त्याच मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकीकडे सोनिया गांधींनी मजुरांच्या तिकिटाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केले असतानाच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. रेल्वे इतर राज्यात अडकलेल्या मजुरांकडून तिकीट भाडे आकारत आहे, तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालय पीएम केअर फंडाला 151 कोटी रुपये देत आहे. ही गुंतागुंत जरा सोडवून द्या, असा टोलाही त्यांनी रेल्वे मंत्रालयाला हाणला आहे.  राहुल गांधींच्या काही वेळापूर्वीच सोनिया गांधींनीही मोदी सरकारवर टीका केली होती. रेल्वेनं घरी परतणाऱ्या देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांकडून तिकिटांचे पैसे आकारणं दुःखद असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. तसेच तो खर्च आता काँग्रेस उचलणार असल्याचंही त्यांनी जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधींनी रेल्वे मंत्रालय पीएम केअर्स फंडाला करत असलेल्या मदतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रेल्वे मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पीएम केअर्स फंडाला  151 कोटी देऊ शकतो, तर मजूर आणि कामगारांना विनातिकिटाची सुविधा का उपलब्ध करून देत नाही?, असा सवालच राहुल गांधींनी विचारला आहे. सोनिया यांनी निवेदनात म्हटले आहे की, मजूर आणि कामगार हा देशाचा कणा आहेत. त्यांची मेहनत आणि त्याग हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे. अवघ्या चार तासांच्या सूचनेवर लॉकडाऊनमुळे लाखो मजूर व कामगारांना घरी परतण्यास नकार देण्यात आला. 1947च्या फाळणीनंतर देशात प्रथमच हजारो मजूर व कामगारांना शेकडो किलोमीटर चालत घरी परत जावे लागल्याचं चित्र पाहिल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं. त्यांच्याकडे रेशन नाही, पैसे नाहीत, औषधे नाहीत, साधन नाही, पण फक्त परत गावी परत जाण्याची आस आहे. आरोग्य सेतू अ‍ॅपवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्नयापूर्वी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने चालवलेल्या आरोग्य सेतू अ‍ॅपवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनी ट्विट केले होते की, "आरोग्य सेतू ऍप ही एक अत्याधुनिक देखरेखीची प्रणाली आहे, जी खासगी ऑपरेटरद्वारे चालवली जाते. यात संस्थात्मक देखरेखीची कोणताही आढावा घेतला जात नसून फक्त नागरिकांची माहिती मिळवली जात आहे. त्यांनी लिहिले, या अ‍ॅपसंदर्भात गंभीर डेटा सुरक्षा आणि गोपनीयता विषयक चिंता आहेत, तंत्रज्ञान आम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकते, परंतु वापरकर्त्याच्या संमतीशिवाय नागरिकांची माहिती मिळवणं योग्य नाही. भीतीच्या नावावर चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

IFSC: खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे; शिवसेनेकडून फडणवीसांचा समाचार

Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना

... तर लॉकडाऊनचे नियम मोडून आम्ही रस्त्यावर उतर, खासदार जलील यांचा इशारा

एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधी