शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : टेस्टिंग किट्स आणि कोरोना चाचण्यांवरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 17:23 IST

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने मोदी सरकारविरोधात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देराहुल  गांधी यांचा कोरोनाची चाचणी आणि टेस्टिंग किट्सच्या उपलब्धतेवरून मोदी सरकारवर हल्लाबोल कोरोनाचा चाचण्या घेण्याच्या बाबतीत भारत लाओस, नायजर, होंडुरास या देशांच्या बरोबरीत कोरोनाच्या टेस्टिंग किट खरेदी करण्याच्या बाबतीत आपल्या देशाने बराच उशीर केला

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित  रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली असून, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांच्या आकडा दहा हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयश येत असल्याने देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडूनकेंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते राहुल  गांधी यांनी कोरोनाची चाचणी आणि टेस्टिंग किट्सच्या उपलब्धतेवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'कोरोनविरोधातील लढाईमध्ये कोरोनाची चाचणी होणे महत्त्वपूर्ण असते. मात्र कोरोनाचा चाचण्या घेण्याच्या बाबतीत आपण लाओस, नायजर, होंडुरास या देशांच्या सोबत उभे आहोत. या देशांमध्ये दर दहा लाख लोकांमागे अनुक्रमे 157, 182 आणि 162 चाचण्या होत आहेत. 

'कोरोनाच्या टेस्टिंग किट खरेदी करण्याच्या बाबतीत आपल्या देशाने बराच उशीर केला. त्यामुळे सध्या टेस्टिंग किट्सची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. कोरोना चाचणीच्या सारसरीचा विचार केल्यास आपण लाओस, नायजर, होंडुरास अशा देशांसोबत उभे आहोत. मोठ्या प्रमाणावर केलेल्या कोरोना चाचण्या या लढाईत फायदेशीर ठरू शकतात. मात्र आज आपण याबाबतीत जगाच्या तुलनेत खूप मागे आहोत,' असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले. 

दरम्यान, संपूर्ण देशात एकाच प्रकारे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने कोट्यवधी शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे जिथे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत ते भाग वगळून इतर भागात हळूहळू व्यवहार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा संदेश प्रसारित होण्यापूर्वी केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार