शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Coronavirus : '24 तासांच्या आत हजर व्हा नाहीतर...', लपलेल्या तबलिगींना पंजाब सरकारचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 21:09 IST

Coronavirus : दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशाच्या अनेक राज्यांत पसरले आहे.

चंदिगड - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशाच्या अनेक राज्यांत पसरले आहे. यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी काही जणांचे मृत्यू झाले आहेत. मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी अनेक राज्यांत आल्याने प्रशासनाची झोप उडाली. यातील काही जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आलं. मात्र अजूनही काहींचा शोध लागलेला नाही. काही राज्यांनी तबलिगींना स्वतःहून समोर येण्याचं आवाहन केलं आहे. पण तरीही काही जण अजूनही समोर येत नसल्याने पंजाब सरकारने तबलिगींना इशारा दिला आहे.

24 तासांच्या आतमध्ये स्वतःहून समोर या, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असं पंजाब सरकारने तबलिगींना सांगितलं आहे. पंजाब सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यात लपून बसलेल्या तबलिगींनी 24 तासांच्या आत जवळच्या पोलीस ठाण्यात हजर व्हावं. जे हे करणार नाहीत त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होतील असं पत्रक जारी केलं आहे. दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकजमधून जे जाऊन आले आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वेगानं वाढला आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमधील मरकजमध्ये सहभागी झालेले 1400 तबलिगी राज्यात आल्यानं प्रशासनाची झोप उडाली. मात्र यातील साडे तेराशे जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आलं. पण अजूनही 50 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही. या 50 जणांनी लवकरात लवकर स्वत:हून पुढे यावं आणि कोरोना चाचणी करून घ्याव्या. अन्यथा आम्ही योग्य कारवाई करू, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

'दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेले 1400 जण राज्यात आले. यातील साडे तेराशे तबलिगींशी संपर्क साधण्यात यश आलंय. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही 50 जण नॉट रिचेबल आहेत. त्यांनी फोन बंद केले आहेत. या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावं. आम्ही त्यांच्या आवश्यक चाचण्या करू. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आमचं प्राधान्य आहे,' असं देशमुख यांनी सांगितलं. लपून बसलेल्या 50 तबलिगींनी शासनाला सहकार्य करावं. अन्यथा आम्ही त्यांना शोधून काढू आणि कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ...म्हणून 'या' डॉक्टरने कारमध्ये थाटलंय घर, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

Coronavirus : 'अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल, लोकांचे जीव गेले तर ते परत कसे आणणार?'

Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबIndiaभारतdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू