CoronaVirus Pranab Mukherjee tests Covid positive has surgery for clot | CoronaVirus News: प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण; लष्करी इस्पितळात दाखल

CoronaVirus News: प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण; लष्करी इस्पितळात दाखल

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीतून निष्पन्न झाल्याने सोमवारी त्यांना येथील मुख्य लष्करी इस्पितळात दाखल केले गेले.

स्वत: ही माहिती ट्विटवर देताना ८४ वर्षांच्या मुखर्जी यांनी लिहिले की, एका वैद्यकीय कामासाठी इस्पितळात गेलो असता कोरोनाची चाचणी केली गेली व ती ‘पॉझिटिव्ह’ आली. गेल्या आठवडाभरात जे माझ्या संपर्कात आले त्यांनी स्वत:हून विलगीकरणात राहून स्वत:ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुखर्जी यांच्या या आजारपणाची माहिती कळताच पक्षभेद बाजूला ठेवून बहुतेक सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी चिंतेची व त्यांना लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छांचे ट्विट केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी इस्पितळात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Pranab Mukherjee tests Covid positive has surgery for clot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.