शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Positive News : पुण्यातील ' नोव्हा लीड ' कंपनीला कोरोनावरील औषधाच्या मानवी चाचणीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 18:21 IST

ही मानवी चाचणी यशस्वी झाल्यास भारतासाठी मोठे यश मानले जाईल.

ठळक मुद्देपुण्यासह देशभरातील विविध शहरांतील १०० कोरोनाबाधित रुग्णांवर ही चाचणी होणार मानवी चाचणीला परवानगी मिळालेली देशातील ही केवळ दुसरी कंपनीप्रत्येक रुग्णावर २१ दिवस चाचणी सुरू राहणार

पुणे : पुण्यातील 'नोव्हा लीड 'फार्मा कंपनीच्या औषधांची कोरोनाबााधित रुग्णांवर चाचणी घेण्यास ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने मान्यता दिली आहे. पुढील तीन-चार आठवड्यात या चाचण्या सुरू होणार असून त्याचे प्रत्यक्ष परिणाम समोर येण्यास तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रित देशपांडे यांनी दिली. पुण्यासह देशभरातील विविध शहरांतील १०० कोरोनाबाधित रुग्णांवर ही चाचणी होणार आहे.कोरोना बाधित रुग्णांतील विषाणुचा संसर्ग कमी करण्यासाठी कंपनीचे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावा नोव्हालीड कंपनीने केला आहे. हे औषध बाजारात आधीपासूनच विक्रीला उपलब्ध आहे. पण या औषधाचे नाव कंपनीकडून प्रसिध्द करण्यात आलेले नाही. सध्या या औषधाला 'एनएलपी २१' हा कोड देण्यात आला आहे. औषधाचे नाव किंवा कोणत्या आजारासाठी हे औषध वापरात आहे, हे सांगतिल्यास लोक खरेदीसाठी गर्दी करतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मागील काही वर्षांपासून हे औषध वापरात असून शरीरावर कोणतेही घातक परिणाम दिसत नाही. प्रयोगशाळेमध्ये कोरोनासाठी या औषधाच्या चाचण्या घेतल्यानंतर इतर औषधांपेक्षा त्याचा परिणाम अधिक वेगाने व प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आल्याचा दावा कंपनीने केली, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रित देशपांडे यांनी दिली.देशपांडे म्हणाले, मानवी चाचणीला परवानगी मिळालेली देशातील ही केवळ दुसरी कंपनी आहे. कंपनीच्या औषधामुळे संसर्ग कमी होण्याबरोबरच पेशींची स्थितीही सुधारते. पुढील ३ ते ४ आठवड्यांमध्ये या औषधांची मानवी चाचणी सुरू होईल. पुण्यातील एका खासगी रुग्णालयासह देशातील विविध शहरांतील पाच रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरू असलेल्या एकुण १०० रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे.  प्रत्येक रुग्णावर २१ दिवस चाचणी सुरू राहील. त्यामुळे पुढील तीन-चार महिने ही चाचणी चालेल. या चाचणी परिणामकारक ठरेल, याची खात्री आहे.दरम्यान, सध्या हायड्रॉक्सीक्लारोक्वीन, फॅविपिरेविर, रिटोनेविर आदी औषधांचा बाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापर केला जात आहे. या औषधांपेक्षा एनएलपी२१ अधिक प्रभावशाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे ही मानवी चाचणी यशस्वी झाल्यास भारतासाठी मोठे यश मानले जाईल.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicinesऔषधंHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या