शहरं
Join us  
Trending Stories
1
Varanasi Lok Sabha Result 2024: सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर; उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर
2
Lok Sabha Election Result 2024 NDA vs INDIA Live Updates: 'एनडीए'ला आघाडी!
3
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live :'बारामती'त सुप्रिया सुळेंनी घेतली आघाडी, सुनेत्रा पवार पिछाडीवर
4
Loksabha Election 2024 Sensex : निकालांदरम्यान शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स २००० अंकांनी, निफ्टी ७६६ अंकांनी घसरला
5
Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर
6
ठाण्यामधून समोर आला धक्कादायक कल, ठाकरे गटाला धक्का शिंदे गटाच्या म्हस्के यांनी घेतली आघाडी  
7
मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर
8
Lok Sabha Election 2024 Result : गांधीनगरमधून अमित शाह ९० हजार मतांनी पुढे, तर राजकोटमधून पुरुषोत्तम रुपालांची आघाडी
9
Hyderabad Lok Sabha Result 2024: सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'?
10
नणंद श्वेता बच्चनला ऐश्वर्या रायच्या या सवयीची येते चीड, खुद्द तिनेच शोमध्ये केला खुलासा
11
Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर
12
मुंबईचा बॉस कोण? मतमोजणीला सुरुवात! भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेनेच्या लढाईत वर्चस्व कोणाचे?
13
"EVM हॅक करणाऱ्याला निवडणूक आयोगाने...."; निकालाआधी काँग्रेसच्या उमेदवाराचे मोठे विधान
14
Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल
15
Lok Sabha Election 2024 : मोदी २.० मध्ये 'या' १३ शेअर्सनं केली कमाल, १ लाखांची गुंतवणूक करणारे झाले ८ कोटीेचे मालक
16
Lok Sabha Election 2024 : सेन्सेक्स जाणार का ८०००० पार? आतापर्यंत कशी होती निकालांनंतरची BSE-NSEची कामगिरी?
17
Maharashtra Lok Sabha election results 2024: महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल
18
“मोदी पुन्हा PM झाल्यास संविधान बदलाचा अधिकार, भारत हिंदूराष्ट्र बनेल”: माजी पाक सचिवांचा दावा
19
लग्नानंतर ३ वर्षांनी वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस बाळाला जन्म
20
कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

Coronavirus :'कोरोनावाला बाबा'ला पोलिसांकडून अटक; 11 रुपयांत देत होता कोरोना ठीक करण्याचं तावीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 9:07 AM

Coronavirus : जे लोक मास्क घालू शकत नाहीत, ते तावीज बांधून कोरोनाला दूर पळवू शकतात. या बोगस बाबाचं नाव बाबा अहमद सिद्दिकी असं आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनऊमध्ये एका भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.हा भोंदूबाबा कोरोना व्हायरस ठीक करण्याचा दावा करत होता. तसेच तो 11 रुपयांमध्ये तावीजही देत होता. या बोगस बाबानं डालिगंजस्थित आपल्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावला होता. ज्यात या जीवघेण्या रोगाला बरा करण्याचा दावा केला जात होता.

लखनऊः उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनऊमध्ये एका भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. हा भोंदूबाबा कोरोना व्हायरस ठीक करण्याचा दावा करत होता. तसेच तो 11 रुपयांमध्ये तावीजही देत होता. या बोगस बाबानं डालिगंजस्थित आपल्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावला होता. ज्यात या जीवघेण्या रोगाला बरा करण्याचा दावा केला जात होता. या बोर्डवर लिहिलं होतं की, जे लोक मास्क घालू शकत नाहीत, ते तावीज बांधून कोरोनाला दूर पळवू शकतात. या बोगस बाबाचं नाव बाबा अहमद सिद्दिकी असं आहे.मुख्य चिकित्सा अधिकारी यांनी सांगितलं की, पोलिसांना याची माहिती दिली आहे. पोलिसांनी आरोपी बाबाला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास चंद्र त्रिपाठी म्हणाले, आरोपी स्वतःला कोरोनावाला बाबा म्हणत होता आणि साध्याभोळ्या माणसांना कोरोनावर उपचार करत असल्याचं सांगून ठगत होता. लखनऊमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच 11 रुग्णांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या तपासणी अहवालाची वाट पाहिली जात आहे. 

भारतात कोरोना व्हायरच्या रुग्णांची संख्या 108 वर पोहोचली आहे. त्यामुळे याचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तर, यासंदर्भात नागरिकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस