coronavirus : मोदींनी मानले देशावासियांचे आभार, पंतप्रधानांनी पुन्हा केलंय नवं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 07:03 PM2020-03-22T19:03:58+5:302020-03-22T19:04:15+5:30

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले.

coronavirus: PM congratulates all indians and appeal to keep fighting with corona with social distance | coronavirus : मोदींनी मानले देशावासियांचे आभार, पंतप्रधानांनी पुन्हा केलंय नवं आवाहन

coronavirus : मोदींनी मानले देशावासियांचे आभार, पंतप्रधानांनी पुन्हा केलंय नवं आवाहन

Next

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशभरात नागरिकांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यु पाळला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्यास, नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर, मोदींच्या आवाहनानुसार देशातील कोरोना संकटाच्या काळात आपलं योगदान देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटनाद करत देशातील डॉक्टर्स आणि पोलिसांप्रति आदर व्यक्त केला. तसेच, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमून गेला. देशावासियांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि कृतज्ञतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन देशवासियांची आभार मानले आहेत. 

नरेंद्र मोदींनी देशावासियांचे आभार मानले, तसेच करोना संकटकाळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व देशबांधवांनाही नमन केले. तर, कोरोनासोबतची आपली लढाई संपली असून आता खरी सुरुवात झाली आहे. त्यामुळे, नागरकिांनी घराबाहेर पडू नये. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही मोदींनी म्हटले. एका मोठ्या लढाईसाठी आपण एकमेकांपासून दूर पाहून या लढाईत आपलं योगदान देऊ, असेही पंतप्रधान यांनी ट्विट करुन म्हटलंय.

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले. नियमित जनता कर्फ्युनंतर लोकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटानाद करुन, शंख फुकून भारत माता की जय च्या घोषणा दिला. देशातील वातावरण या ५ मिनिटांसाठी स्फुर्तीमय बनले होते. कोरोना विषाणूचा अत्यंत झपाट्याने फैलाव होताना दिसत आहे. कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिवसभर जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी देशवासीयांना रविवारी म्हणजे 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्यास सांगितलंय. कोरोनाच्या तिसऱ्या व अतिशय संवेदनशील टप्प्यावर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येकाने प्रतिसाद दिल्याचे आज पाहायला मिळाले. 

दरम्यान, ‘लोकमत’नेही मोदी सरकारच्या या प्रयत्नांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे म्हटले होतेड. लोकांनी स्वत:हून संचारबंदीत सहभागी व्हावे. सरकार, प्रशासन व पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, दूधवाला, कचरावेचक, सकाळी रोज घराघरांत जाऊन पेपर टाकणारे हे सारे आपल्यासाठी झटत आहेत. पाच मिनिटांचा वेळ काढून थाळी नाद, घंटानाद, शंखनाद करून ही महत्त्वाची भूमिका बजावू या. अशा व्यक्तींच्या कामगिरीला सलाम करायला हवा. कोरोनाविरुद्धच्या युद्धात प्रत्येकाने सैनिकाप्रमाणे लढू या आणि पाच मिनिटांचा वेळ काढू या, असे आवाहन लोकमते केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला देशातील नागरिकांनी उंदड प्रतिसाद दिला. तर, गाव-खेड्यातील नागरिकांपासून ते देशाच्या राजधानीपर्यंत सर्वांनीच आपलं पद, प्रतिष्ठा विसरुन कोरोना संकाटाचा मुकाबला करणाऱ्या लढवय्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. 
 
 

Web Title: coronavirus: PM congratulates all indians and appeal to keep fighting with corona with social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.