Coronavirus: Patient doubling period 70 days; Rapid decline in the number of new patients | Coronavirus: रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस; नव्या रुग्णांच्या प्रमाणात झपाट्याने घट

Coronavirus: रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस; नव्या रुग्णांच्या प्रमाणात झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा ऑगस्टच्या मध्यावधीस २५.५ दिवस इतका असणारा कालावधी आता ७०.४ दिवसांवर गेला आहे. त्यावरून दररोज आढळणाºया नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट होते. गुरुवारी कोरोनाचे आणखी ६७,७०८ नवे रुग्ण आढळले आहेत. या आजाराच्या रुग्णांची एकूूण संख्या ७३ लाखांवर पोहोचली आहे.

भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १८ ऑगस्ट रोजी २७.७ दिवस, ३० ऑगस्ट रोजी ३२, १७ सप्टेंबर रोजी ३५.६ दिवस, २ ऑक्टोबरला ५१.४ दिवस, १४ ऑक्टोबरला ७०.४ दिवस असा होता. महिनाभरापूर्वी काही दिवस देशात दररोज कोरोनाचे ८० ते ९० हजार नवे रुग्ण आढळत होते. मात्र, आता हा आकडा कमी झाला आहे. मंगळवारी ५५,३४२, बुधवारी ६३,५०९ नवे रुग्ण सापडले
होते.

रुग्ण दुप्पट होण्यास आता लागतात 70.4 दिवस
कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १८ ऑगस्ट रोजी २७.७ दिवस, ३० ऑगस्ट रोजी ३२, १७ सप्टेंबर रोजी ३५.६ दिवस, २ ऑक्टोबरला ५१.४ दिवस.

देशामध्ये कोरोना रुग्णसंख्या 73,07,097 झाली असून बरे होणाऱ्यांची संख्या 63,83,441 झाली आहे. बरे होणाºयांचे प्रमाण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ८७.३५ टक्के आहे. या आजारामुळे गुरुवारी आणखी ६८० जण मरण पावले असून त्यामुळे बळींचा एकूण आकडा 1,11,26 झाला आहे. देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.52% इतका कमी राखण्यात यश आले आहे. सध्या 8,12,390
कोरोना रुग्ण उपचार घेत असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 11.11% टक्के आहे. बळींची संख्या तामिळनाडूमध्ये 10,423,
कर्नाटकात 10,198, उत्तर प्रदेशात 6,507, आंध्र प्रदेशमध्ये 6,319, दिल्लीत 5,898, पश्चिम बंगालमध्ये 5,808, पंजाबमध्ये 3,925, गुजरातमध्ये 3,595, इतकी आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Patient doubling period 70 days; Rapid decline in the number of new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.