शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

CoronaVirus: निरागसांना कोण समजावणार? कोणी आई, तर कोणी बाप गमावला; कोरोनाच्या संकटात 1742 मुले अनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 1:53 PM

Children's lost there parents due to corona Virus: सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आदेश दिले होते. आता राज्ये आणि केंद्र सरकारने त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत.

 कोरोना संकटाने देशभरात लाखो बळी (Corona Death) घेतले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. बेरोजगार झाले आहेत. परंतू त्यापेक्षाही मोठे दु:ख हे हजारो मुलांवर कोसळले आहे. देशात मार्च 2020 पासून ते आजपर्यंत कोरोनामुळे 1742 मुलांनी आई वडील दोन्ही गमावले आहेत. तर 7464 मुलांनी आई किंवा वडीलपैकी एक गमावले आहेत. (Covid-19 pandemic, which has devastated families across the country, has orphaned over 1,700 children, led to 140 children being abandoned while more than 7,400 children lost one of their parents,)

CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्लासर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारने ही आकडेवारी आज सर्वोच्च न्यायालयासमोर दिली आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शनऑफ चाईल्ड राईट्स (NCPCR) ने या मुलांच्या संगोपनासाठी, भविष्यासाठी आर्थिक मदत मागितली आहे. 

कोरोना संक्रमणामध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरु आहे. यावेळी सरकारने न्यायालयाला सांगितले की, मार्च 2020 पासून आतापर्यंत 1742 मुलांनी आपले पालक गमावले तर 7464 मुलांनी एका पालकाला गमावले आहे. 

CoronaVirus: लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका? केंद्राने दूर केले टेन्शन

महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारीमहाराष्ट्राच्या अहमदनगरमध्ये एका महिन्याच्या आत 10000 मुले आणि अल्पवयीन कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. पेडियाट्रीक टास्क फोर्सचे सदस्य सचिन सोलट यांनी सांगितले की, यामध्ये काही मोठा इशारा देण्यासारखे नाहीय. लहान मुलांना तरुणांच्या तुलनेत 11.5 टक्के कोरोनाची बाधा झाली आहे, जी असामान्य नाहीय. 

कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) लहान मुलांसाठी (Children's) सर्वाधिक धोकादायक असणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारचे म्हणणे याहून वेगळे आहे. एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी याचे कोणतेही पुरावे नाहीत असे म्हटले आहे. गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे मुलांना कमी प्रमाणावर संक्रमण झाले आहे. यामुळे आतापर्यंत तरी असे वाटत आहे की, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना संक्रमित करणार नाही.  अनेक संशोधकांनी लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले कोरोनाने प्रभावित झालेली नाहीत. त्यांना लसही दिलेली नाही. यामुळे ते तिसऱ्या लाटेत सर्वाधिक संक्रमित होतील, याचे काही पुरावे मिळालेले नाहीत, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे मांडले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या