शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

coronavirus: चीनमधील एक हजार गुंतवणूकदारांचे भारताकडे लक्ष -हरदीपसिंग पुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 5:24 AM

नागरी उड्डयन आणि गृहनिर्माण (स्वतंत्र प्रभार) आणि वाणिज्य राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी नवी दिल्लीत घेतलेली मुलाखत.

 नागरी उड्डयन आणि गृहनिर्माण (स्वतंत्र प्रभार) आणि वाणिज्य राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी नवी दिल्लीत घेतलेली मुलाखत.चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांची खूप चर्चा आहे. काही प्रगती?आम्ही विविध मंत्रालयांसोबत १,००० संभाव्य गुंतवणूकदारांची यादी शेअर केली आहे. जेणेकरून, गुंतवणुकीला गती येईल. फॉक्सकॉन अँड विस्ट्रॉन (अ‍ॅपलसाठी काम करणारी कंपनी), कार्बन, लावा यांनी प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज केला आहे. यासाठी आम्ही एका संस्थात्मक आराखड्याच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. जपान सरकार चीनमधील त्यांच्या कंपन्यांना स्थलांतरित करण्यासाठी निधी देणार आहे.२०२०- २१ या काळात किती कंपन्या येतील?ही तर एक सुरुवात आहे. मात्र, कोरोनाच्या काळात जागतिक स्तरावर आदान-प्रदानाची साखळी खंडित झाली आहे. जपान, कोरिया आणि अमेरिकेच्या कंपन्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यावर एवढा विश्वास दाखविण्याचे रहस्य काय?पंतप्रधान मोदी यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझ्याकडे दिलेल्या जबाबदाºया याबद्दल मी त्यांचा खूप कृतज्ञ आहे. ते जे काम देतील ते मी उत्तमरीत्या करीन.तुम्ही पहिल्यांदाच खासदार झाला असून, माजी मुत्सद्दी आहात.भारतीय परराष्ट्र सेवेत आणि मुत्सद्दी म्हणून मी ४० वर्षे काम केले. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश व्हायच्या आधी मी ‘थिंक टँक’चा अध्यक्ष होतो.उड्डयन मंत्रालय सर्व मंत्रालयांत कठीण आहे?ते फारच कठीण आहे, असे मी म्हणणार नाही; परंतु फक्त भारतातच अर्थव्यवस्थेच्या आव्हानात्मक क्षेत्रांपैकी एक आणि महत्त्वाचे हे क्षेत्र आहे, असे नाही तर जगातही महत्त्व आहे.आज तुम्ही सगळ्यात मोठ्या कोणत्या आव्हानाला तोंड देत आहात?उड्डयन उद्योगाला कोविड-१९ चा फार मोठा फटका बसला. जगात अनेक विमान कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. लॉकडाऊननंतर लगेचच लाईफ लाईन उडान मोहिमेत एअर इंडियाने विदेशातून १९०० टन वैद्यकीय साहित्य आणले आणि मित्रदेशांना ३० टन पाठवले. वंदे भारत उड्डाणांद्वारे साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांना हलविण्यात आले. आमच्यासमोर आव्हान आहे ते आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे.आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित कधी सुरू होणार?आमची देशातील हवाई वाहतूक तिच्या क्षमतेच्या ५०-६० टक्क्यांपर्यंत पोहोचली की आणि इतर देश कोणत्याही अटी किंवा बंधनाशिवाय आंतरराष्ट्रीय वाहतूक कशी खुली करतात, त्यानुसार नियमितपणे आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील. परंतु राज्यांना तर देशांतर्गत उड्डाणेही वाढविण्याची भीती आहे.२६ जूनपासून ४५ टक्के क्षमतेपर्यंत ते गेले आहे. पहिल्या दिवशी ३० हजार प्रवाशांसह सुरुवात केली आणि ६५ हजारांना स्पर्श केला. उड्डाणांची संख्या दिवसाला ४३० वरून ७५० झाली.अनेक राज्यांनी स्पष्टपणे नकार दिला असताना तुम्ही हे यश कसे मिळवले?आम्ही त्यांच्याशी बोललो. ते त्यांच्या काही तोडग्यासह (क्वारंटाईन ते चाचण्या इत्यादी) आले होते.महाराष्ट्राने उड्डाणांना नकार दिला होता?(हसले). उद्धव ठाकरेजी हे माझे प्रिय मित्र आहेत. महाराष्ट्र सरकारने मुंबईसाठी फक्त २५ उड्डाणांना परवानगी दिली. रोजची ५० विमाने येणार व जाणार.एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया रुळावर आहे काय?कोरोना साथीमुळे विलंब होत आहे; पण प्रक्रिया रुळावरून उतरलेली नाही.बस सुरू झाल्या आहेत. मात्र, दिल्ली व इतरत्र मेट्रो नाही?मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार घेतला जाईल.ई-कॉमर्स कंपन्यांनी उत्पादनांवर मूळ देशाचे नाव द्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत?यात चूक काय आहे? आम्ही ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबत सांगितले आहे की, उत्पादनांवर मूळ देशाचे नाव असावे. भारत योग्य मार्गावरून जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत