Coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओला, उबर कंपन्यांचा मोठा निर्णय, लोकप्रिय पर्याय स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 01:51 PM2020-03-21T13:51:35+5:302020-03-21T13:53:22+5:30

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बुकिंग मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी शेअरिंग राइड ही सुविधा थांबवली आहे.

Coronavirus: Ola, Uber suspend shared rides temporarily vrd | Coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओला, उबर कंपन्यांचा मोठा निर्णय, लोकप्रिय पर्याय स्थगित

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओला, उबर कंपन्यांचा मोठा निर्णय, लोकप्रिय पर्याय स्थगित

Next
ठळक मुद्देविशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका ओला, उबर कंपन्यांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बुकिंग मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी शेअरिंग राइड ही सुविधा थांबवली आहे. जे लोक ओलाच्या शेअर आणि उबरच्या पूल सर्व्हिसचा वापर करत होते, त्यांना आता त्या सुविधेचा लाभ मिळणार नाही.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक देशांना या कोरोना व्हायरसनं विळख्यात घेतलं आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम हा देशातल्या मोठ्या सेक्टरवर झालेला आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका ओला, उबर कंपन्यांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बुकिंग मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी शेअरिंग राइड ही सुविधा थांबवली आहे. म्हणजेच जे लोक ओलाच्या शेअर आणि उबरच्या पूल सर्व्हिसचा वापर करत होते, त्यांना आता त्या सुविधेचा लाभ मिळणार नाही.
 
कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ओला-उबरनं घेतला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओला शेअर सुविधा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कंपनीच्या मायक्रो, मिनी, प्राइम, रेंटल आणि आउटस्टेशनसारख्या सुविधा सुरूच राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया ओलानं दिली आहे. तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या शहरांत आम्ही सेवा देतो, त्या शहरांमधील उबर पूलची सेवा थांबवण्यात आलेली आहे, अशीही माहिती उबरनं दिली आहे. 

काय खास आहे या सुविधांमध्ये?
ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांच्या शेअर आणि पूल सेवेंतर्गत रस्त्यावरील प्रवाशांना एकत्र प्रवास करण्याची सुविधा मिळते. या सुविधेत किंमत फारच कमी असते. त्यामुळे मेट्रो शहरात या सुविधांना अधिक मागणी आहे. 

लांब पल्ल्याच्या 4000 गाड्या रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी मुंबईत मोजक्याच लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा तपशील शनिवारी जाहीर केला जाईल. त्याचवेळी देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे 4 ते रात्री 10 या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. रेल्वेच्या सर्व विभागांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी मुंबईत लोकलचे वेगळे वेळापत्रक असते. तसेच मेगाब्लॉकच्या काळात काही सेवा रद्द केल्या जातात. त्यानंतरही अनेक लोकल रद्द करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या किती फेºया रद्द होतील, याची माहिती शनिवारी जाहीर केली जाईल. आयआरसीटीसीनेही फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जनआहार, सेल किचन या सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

Web Title: Coronavirus: Ola, Uber suspend shared rides temporarily vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :OlaUberओलाउबर