शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली ६०० च्या पुढे; तामिळनाडूत पहिला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 2:43 AM

coronavirus : तामिळनाडूत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निमलष्करी दलाची देशभरातील ३२ रुग्णालये सरकारने ताब्यात घेतली आहेत.

कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येने बुधवारी ६०० ची संख्या ओलांडली. दरम्यान, लष्कर व केंद्रीय निमलष्करी दलाने कोरोनाग्रस्तांसाठी २,००० पेक्षा जास्त खाटांची व्यवस्था केली आहे, तसेच हिमाचल प्रदेशात हमीरपूर जिल्हा प्रशासनाने नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातील २००० खोल्या रुग्णांसाठी घेतल्या आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसने महाराष्टÑात ११६ व केरळात १०९ रुग्णांची संख्या ओलांडली आहे. देशातील ६१२ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५६२ जण सध्या या आजाराने ग्रस्त आहेत, तर ४० जण बरे झालेले आहेत. तामिळनाडूत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला.कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निमलष्करी दलाची देशभरातील ३२ रुग्णालये सरकारने ताब्यात घेतली आहेत. त्यामध्ये १,९०० खाटा आहेत. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस व सशस्त्र सीमा बलची ही रुग्णालये ग्रेटर नोएडा, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू-तेकानपूर (ग्वाल्हेर), दिमापूर, इम्फाळ, नागपूर, सिल्चर, भोपाळ, आवाडी, जोधपूर, कोलकाता, पुणे व बंगळुरू येथील ही रुग्णालये आहेत. सीमा सुरक्षा करणाऱ्या आयटीबीपीमध्ये तर देशातील सर्वांत मोठे क्वारंटाईन सेंटर चालवले जात आहे. तेथे १,००० जणांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना व्हायरससंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी एक व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक जारी केला आहे. 9013151515 असा तो नंबर असून, त्यावरील सेवा २४ तास सुरू असेल, असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या