Coronavirus : कोरोनाच्या धसक्याने रस्त्यावर पडलेल्या २ हजारांच्या नोटा कोणी उचलल्या नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 07:24 PM2020-04-11T19:24:35+5:302020-04-11T19:28:35+5:30

Coronavirus : २ हजाराच्या ७ नोटा रस्त्यावर पडल्याचं अनेकांनी पाहून सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा केला.

Coronavirus : No one picked up the 2,000 notes lying on the road due to the corona scare pda | Coronavirus : कोरोनाच्या धसक्याने रस्त्यावर पडलेल्या २ हजारांच्या नोटा कोणी उचलल्या नाही 

Coronavirus : कोरोनाच्या धसक्याने रस्त्यावर पडलेल्या २ हजारांच्या नोटा कोणी उचलल्या नाही 

Next
ठळक मुद्देलोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एरव्ही रस्त्यावर १० रुपयाची नोट जरी कोणाला दिसली तरी ती लोकं उचलत असत. काही वेळाने पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या नोटांवर दगड ठेवले.

नवी दिल्ली -  कोरोनाची धसका लोकांनी इतका घेतला की, लोकं आता रस्त्यावर पडलेल्या नोटा देखील उचलायला घाबरत आहेत. दिल्ली येथील बुद्ध विहार परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्यावर २ हजारांच्या नोटा पडल्या होत्या. मात्र, कोणी उचलण्याची हिंमत देखील केली नाही. २ हजाराच्या ७ नोटा रस्त्यावर पडल्याचं अनेकांनी पाहून सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा केला.

देशात कोरोनाच्या रुग्णांची आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एरव्ही रस्त्यावर १० रुपयाची नोट जरी कोणाला दिसली तरी ती लोकं उचलत असत. पण आज देशात अशी परिस्थिती ओढवली आहे की, कोरोनाच्या भीतीमुळे लोकं कोणत्याही वस्तूला हात लावताना हजारदा विचार करतात. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कोरोना पसरवण्यासाठी नोटांना थुंकी लावून टाकण्यात आल्याचं दिसत होतं. त्यामुळे दिल्लीतील या घटनेत लोकांनी या नोटा उचलण्यास मन धजावले नाही.

काही वेळाने पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या नोटांवर दगड ठेवले. त्यानंतर एक व्यक्ती काही वेळेत तेथे आला आणि त्याने त्याच्या खिशातून हे पैसे पडल्याचा दावा केला. या व्यक्तीने एटीएममधून पैसे काढले होते. पण खिशात ठेवताना त्या नोटा त्याच्या खिशातून खाली पडल्या. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शहानिशा करून ७ नोटा त्या व्यक्तीला परत केल्या. 

Web Title: Coronavirus : No one picked up the 2,000 notes lying on the road due to the corona scare pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.