शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 06:26 IST

Coronavirus in India: विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असेल यावर देश आणि जगातील डॉक्टर्स पूर्णपणे सहमत नाहीत. विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.इटलीचे डॉक्टर टोटा लुइगी यांचा तर्क आहे की, आतापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे तिच्या आधारावर ही तिसरी लाट मुलांमध्ये सर्वात जास्त पसरेल आणि ती त्यांच्या जीविताला धोका ठरेल, असे म्हणता येत नाही. जगात मुलांसाठी कोणतीही लस नाही यामुळे असा समज निर्माण होतो.दिल्लीतील बालरोग विशेषज्ञ डॉक्टर हेमा बिष्ट म्हणतात की, “लाट दुसरी असो वा तिसरी मुलांना संक्रमणापासून दूर ठेवणे महत्त्वाचे. परंतु, तिसऱ्या लाटेचे संकेत असतील तर केवळ त्या आधारावर मुलांना बाधा होईल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.” ऑक्सफ़ोर्डचे डॉक्टर अमित गुप्ता मानतात की, “आज जे काही उपलब्ध आहे त्या आधारावर तुम्ही मुलांमध्ये संक्रमण होईल, असे म्हणता. परंतु, तसे म्हणणे घाईचे ठरेल. कारण या मुद्यावर अजून काही विशेष माहिती उपलब्ध नाही.” हा नवा म्युटेंट मुलांना संक्रमित करू शकतो. या म्युटेंटबाबत ही  गोष्ट पूर्ण शक्य आहे की, मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसणार नाहीत परंतु त्यांना त्याची बाधा होऊ शकते. डॉक्टर्स आणि विशेषज्ञही माहिती कमी उपलब्ध असल्यामुळे संभ्रमात आहेत. आम्हाला तयार राहावे लागेल-गुलेरियाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, “सामान्यत: हे पाहण्यात आले आहे की, अशा प्रकारची महामारी तीन टप्प्यांत आपला प्रभाव निर्माण करते. तिचा दुसरा टप्पा सर्वांत जास्त धोकादायक समजला जातो. तिसरी लाट मुलांना संक्रमित करील याबद्दल जे बोलले जात आहे त्यात स्पष्टता नाही. कारण आतापर्यंत जगातून जी माहिती मिळाली त्या आधारावर कोणतीही भविष्यवाणी करणे घाईचे ठरेल. कारण म्युटेंटचा स्वभाव पाहता मुलांबाबत आम्हाला तयार राहावे लागेल. कारण आज आमच्या हाताशी कोणतीही लस उपलब्ध नाही.”कोरोनामुक्त झाल्यावर एक वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम टोकियो : कोरोनावर मात केलेल्या ९६ टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवळपास २५० व्यक्तींच्या शारीरिक स्थितीची चाचणी केली.    २५० जणांमध्ये २१ ते ७८ वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. जास्त लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत