शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: महाराष्ट्रासह नऊ राज्यांनी कोरोना नुकसान भरपाईची माहिती दिली नाही, सर्वोच्च न्यायालयाची फटकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:42 IST

Maharashtra News: कोरोनाने मरण पावलेल्यांच्या किती वारसदारांनी भरपाईसाठी अर्ज केले, त्यातील किती लोकांना भरपाई दिली, याबद्दलची कोणतीही माहिती महाराष्ट्रासह नऊ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारला अद्याप दिलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाने मरण पावलेल्यांच्या किती वारसदारांनी भरपाईसाठी अर्ज केले, त्यातील किती लोकांना भरपाई दिली, याबद्दलची कोणतीही माहिती महाराष्ट्रासह नऊ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारला अद्याप दिलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच देशभरात अशा वारसदारांपैकी खूपच कमी लोकांना भरपाई मिळाली असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने  चिंता व्यक्त केली.

कोरोना मृतांच्या वारसदारांपैकी किती लोकांनी भरपाईसाठी अर्ज केले, त्यापैकी किती जणांना भरपाई दिली, याची माहिती केंद्र सरकारला न देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, आसाम, झारखंड,  सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड, जम्मू-काश्मीर, लडाख यांचा समावेश आहे.

या भरपाई योजनेची राज्य सरकारांनी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एम. आर. शहा व न्या. बी. एन. नागरत्न यांच्या खंडपीठाने सर्व राज्यांना दिला. कोरोना मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई देण्यात येेते. प्रत्येक राज्यात कोरोनामुळे किती मृत्यू झाले, त्यांच्यापैकी किती जणांच्या वारसदारांना भरपाई देण्यात आली, याचा अहवाल राज्यांनी सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.  

ऑनलाइन पोर्टल सुरू करावेया प्रकरणी वकील कुमार बन्सल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई देण्यासाठी गुजरात सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. भरपाईसाठी वारसदाराने दावा करण्याची पद्धत सोपी हवी. प्रत्येक राज्यात कोरोना मृतांच्या वारसदारांपैकी भरपाईसाठी अर्ज केलेल्या लोकांची संख्या कमी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय