शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

coronavirus: "दररोज सहा लाख रुग्णांसाठी ऑक्सिजनची तयारी ठेवा, कोरोनाविरोधात प्लॅन-बी तयार करा’’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 17:01 IST

coronavirus in India : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील एका अधिकारप्राप्त समुहाने सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा झालेला मोठ्या प्रमाणावरील फैलाव आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाढलेली रुग्णसंख्या यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील एका अधिकारप्राप्त समुहाने सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. देशात दररोज सहा लाख रुग्णांसाठी ऑक्सिजनची तयारी ठेवावी. तसेच कोरोनाविरोधात लढण्यासाठीचा पर्यायी आराखडा (प्लॅन बी) तयार ठेवा, असा सल्ला या समितीने दिला आहे. ( NIITI Aayog member Dr. V.K.Pauls panel said"Prepare oxygen for six lakh patients every day, prepare Plan-B against coronavirus")

दहा महिन्यांपूर्वी डॉ. पॉल यांच्याच पॅनेलने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अन्य अधिकाऱ्यांना दररोजची तीन लाख एवढी रुग्णसंख्या विचारात घेऊन ऑक्सिजनची व्यवस्था करा, असा सल्ला दिला होता. 

डॉ. पॉल यांच्या नेतृत्वाखालील मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि कोविड मॅनेजमेट प्लॅन या अधिकारप्राप्त समुहाने प्लॅन बी अंतर्गत ऑक्सिजनचा साठा वाढवण्यासाठी व्यापक उपायांची शिफारस केली आहे. या समुहाने ही शिफारस एका दिवसात सहा लाख रुग्णवाढीचा अंदाज बांधून त्यानुसार गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने केली आहे. एका आदेशात म्हटले आहे की,ऑक्सिजनची उपलब्धता आणि साथीमुळे बिघडत असलेली परिस्थिती याबाब अधिकारप्राप्त समूह-२ ला माहिती दिली गेली पाहिजे. अधिकारप्राप्त समूह २ चे नेतृत्व डॉ. गुरुप्रसाद महापात्र करत आहेत. कोरोना प्रभावित राज्यांना मेडिकल ऑक्सिजनसह आवश्यक उपकरणे पुरवण्यात येतात की नाही, याचा आढावा घेणे, ही या गटाची प्राथमिक जबाबदारी आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील एका बैठकीमध्ये डॉ. पॉल यांच्या नेतृत्वाखालील अधिकारप्राप्त गटाने सरकारला प्लॅन बीची शिफारस करण्यास सांगितले होते. हल्लीच एका प्रसिद्धीपत्रकामधून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये व्यवस्थापन आणि नियमनामध्ये सक्ती आणण्याचा सल्ला दिला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यNIti Ayogनिती आयोग