शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 17:03 IST

आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत बाठक करणार. (CoronaVirus)

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी उच्च स्थरिया बैठक घेतली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. यानंतर, कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असे डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे. (The next three weeks are crucial, all states should be vigilant says Central Government government )

याशिवाय, त्यांनी सर्व राज्यांना, अॅडव्हान्समध्ये 3 आठवड्यांचे नियोजन करण्यास सांगितले आहे. तसेच गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी बाजारांमध्ये होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे.

Corona Vaccine: अमेरिका भारताला कोरोना लसीचा कच्चा माल देईना; कारणही सांगेना!, नेमका विचार काय?

PM मोदींची आज सायंकाळी 6 वाजता फार्मा कंपन्यांसोबत बैठक -देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बाठक करणार आहेत. यापूर्वी सोमवारी त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील प्रमुखांशी चर्चा केली होती. याच बरोबर पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत औषध क्षेत्राच्या महत्वपूर्ण भूमिकेचेही कौतुकही केले.

भारत बनला फार्मेसी ऑफ वर्ल्ड - मोदीमोदी म्हणाले, औषध उद्योगाच्या प्रयत्नांमुळेच, आज भारताला जगात फार्मेसी ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखले जाते. आपण या महामारीच्या काळात जगातील 150 हून अधिक देशांना आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण -गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

CoronaVirus: आता इस्रायलमध्ये मास्क लावण्याची आवश्यकता नाही; असा आदेश देणारा जगातील पहिलाच देश!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी