शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

पुढच्या वर्षात 5 कोटी रोजगार; नितीन गडकरींनी सांगितलं MSME पॅकेज कसं चमत्कार करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 15:14 IST

कोरोनानंतरच्या संधी आणि आव्हानांवर नितीन गडकरींसोबत 'लोकमत'चा संवाद

मुंबई: कोरोना संकटावर मात करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भरीव तरतूद असून याचा मोठा फायदा देशाला होईल, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं. पुढील वर्षात आम्ही ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमुळे ते प्रत्यक्षात उतरेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. लोकमतनं आयोजित केलेल्या ‘पुनश्च भरारी - आव्हाने आणि संधी’ या वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते. यावेळी लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी गडकरींशी संवाद साधला.कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योगांना, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 'आत्मनिर्भर भारत' पॅकेजवर गडकरींनी भाष्य केलं. 'आत्मनिर्भर भारत पॅकेज म्हणजे एमएसएमईचं धोरण नव्हे. देशाच्या जीडीपीत एमएसएमईचं योगदान सध्या २९ टक्के आहे. ते ५० टक्क्यांवर नेण्याचं लक्ष्य आहे. सध्या ४८ टक्क्यांवर असलेली निर्यात ६० टक्क्यांवर नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे,' असं गडकरी म्हणाले.कोरोनामुळे देशावरच नव्हे, तर जगावर संकट आलं आहे. मात्र या संकटाचं संधीत रुपांतर करुन आत्मनिर्भर भारताची निर्मिती करणार असल्याचं गडकरींनी म्हटलं. यासाठीचा रोडमॅपदेखील त्यांनी सांगितला. आपण जवळपास २०० परदेशी कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभाग घेण्यापासून मज्जाव केला आहे. ती कामं आता भारतीय एमएसएमईंना मिळतील. त्यामुळे रोजगार वाढतील. गरिबांच्या हाती पैसा येईल. त्यामुळे गरिबी दूर होईल, अशा शब्दांमध्ये गडकरींनी सरकारची योजना थोडक्यात सांगितली. मुंबई एमएसएमई स्टॉक एक्स्चेंज सुरू करण्याचा विचार असून त्यामुळे एमएसएमई क्षेत्राला उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.पुढच्या वर्षात आम्ही ५ कोटी रोजगार निर्माण करू. त्यामध्ये एमएसएमईचा सिंहाचा वाटा असेल, असं गडकरी म्हणाले. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था तयार करण्यात आत्मनिर्भर भारत पॅकेजचं योगदान मोठं असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांनी एमएसएमई उद्योगांचे पैसे थकवले आहेत. हा आकडा ५ ते ६ लाख कोटींच्या घरात आहे. या कंपन्यांनी ४५ दिवसांमध्ये थकलेले पैसे द्यावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती गडकरींनी सांगितली.कोरोना संकटानंतरची आव्हानं आणि संधी या विषयावर लोकमतनं आयोजित केलेल्या ‘एम्ब्रेसिंग दी न्यू नॉर्मल - द फ्यूचर ऑफ एमएसएमई सेक्टर’ या वेबिनारमध्ये नितीन गडकरी यांच्यासह ‘नरेडको’ आणि ‘असोचेम’चे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, पुनावाला फायनान्सचे एमडी आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी अभय भुतडा, ‘ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन’चे माजी अध्यक्ष के. ई. रघुनाथन यांनी मार्गदर्शन केलं. ...म्हणून त्यावेळी मला खूप दु:ख झालं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंतकोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधानमोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरी