ब्लॅक, व्हाईट, यलो फंगसनंतर आता नवं संकट; आठ रुग्ण आढळल्यानं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 02:52 PM2021-05-27T14:52:31+5:302021-05-27T14:53:02+5:30

Coronavirus News: कोरोना संकट संपता संपता संपेना; नवा फंगस आढळल्यानं चिंतेत भर

Coronavirus news Vadodara Reports Rising Cases Of Nasal Aspergillosis After Black Fungus | ब्लॅक, व्हाईट, यलो फंगसनंतर आता नवं संकट; आठ रुग्ण आढळल्यानं चिंतेत भर

ब्लॅक, व्हाईट, यलो फंगसनंतर आता नवं संकट; आठ रुग्ण आढळल्यानं चिंतेत भर

Next

अहमदाबाद: कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसचा धोका असताना आता आणखी एक नवा धोका समोर आला आहे. गुजरातमधील बडोद्यात कोरोना रुग्णांसोबत यातून मुक्त झालेल्यांना ऐस्पर्जलोसिस (Aspergillosis) फंगस इंफेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. आधीच ब्लॅक फंगसचे (म्युकोरमायकोसिस) रुग्ण वाढत असताना त्यात आता नवा फंगस आढळून आल्यानं वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे. नव्या फंगसचा धोका निर्माण झाल्यानं कोरोना रुग्णदेखीत चिंतेत सापडले आहेत.

कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका

बडोद्यातील दोन सरकारी रुग्णालयांमध्ये म्युकोरमायकोसिसचे २६२ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एका रुग्णालयात गेल्या आठवड्याभरात आठ जणांना ऐस्पर्जलोसिसची लागण झाली. कोरोना रुग्णांच्या उपचारांत वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉईड्समुळे ऐस्पर्जलोसिसचा धोका वाढत आहे. यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठा हायड्रेट करण्यासाठी होणारा निर्जंतुकीकरण न केलेल्या पाण्याचा वापरही यासाठी कारणीभूत ठरत आहे. याच रुग्णालयात मल्टी ड्रग्सज रेजिस्टंस यीस्ट इंफेक्शन कँडिडा ऑरिसचे १३ रुग्ण आढळून आले आहेत.

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना पल्मोनरी ऐस्पर्जलोसिसची लागण झाल्याचं सर्वसामान्यपणे दिसून येतं. मात्र साइनस ऐस्पर्जलोसिसचा प्रकार पहिल्यांदाच समोर आल्याचं शहराच्या कोविड-१९ सल्लागार डॉ. शीतल मेस्त्री यांनी सांगितलं. कोरोनाची लागण झालेल्या आणि त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना ऐस्पर्जलोसिसची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र ऐस्पर्जलोसिस ब्लॅक फंगसप्रमाणे वेगानं पसरत नाही. मात्र तो अतिशय आक्रमक असतो, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Coronavirus news Vadodara Reports Rising Cases Of Nasal Aspergillosis After Black Fungus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.