शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: चिंताजनक! कोरोनाचे नवे हॉटस्पॉट सापडले; देशाचे टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 11:59 IST

Coronavirus News: दक्षिणेतील राज्यांनी देशाचं टेन्शन वाढवलं; केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. १ मे रोजी देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या ४ लाख नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर काही दिवस कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. मात्र आज पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा स्थिरावला आहे. राज्यात लॉकडाऊन लागू असल्यानं कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. मात्र शेजारच्या राज्यांमध्ये आता कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.मोदींच्या वाराणसीत गंभीर परिस्थिती; आमचे खासदार गरजेच्या वेळी कुठे आहे?, जनतेचा सवालदेशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. गेल्या महिनाभरात दक्षिण भारतातील परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र आता ती हाताबाहेर जाऊ लागल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत दक्षिण भारतातील ४ राज्यांत कोरोनाचे १ लाख ३७ हजार ५७९ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी कर्नाटकाची अवस्था भीषण आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५० हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होतील; सुब्रमण्यम स्वामींच्या इशाऱ्याने उडाली खळबळबंगळुरूत कोरोनाचा विस्फोटबंगळुरूत कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. बंगळुरूची अवस्था आता दिल्लीसारखी झाली आहे. गेल्या २४ तासांत बंगळुरूत कोरोनाच्या २३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद पहिल्यांदाच देशात झाली आहे. कर्नाटकात सध्या ४ लाख ८७ हजार २८८ जणांवर उपचार सुरू आहेत.केरळमध्ये लॉकडाऊनची घोषणाकेरळमध्ये गेल्या २४ तासांत ४१ हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. तर ५८ जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १७ लाख ४३ हजार ९३२ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी राज्यात ८ मे १६ मे दरम्यान कठोर लॉकडाऊन लागू केला आहे.आंध्र प्रदेश, तमिळनाडूतही कोरोनाचं थैमानआंध्र प्रदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२ हजारहून अधिक रुग्ण सापडले. तर याच कालावधीत ८५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ५ दिवसांत राज्यात १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तमिळनाडूतही कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २३ हजार ३१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत १६७ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या