शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

CoronaVirus News: सगळ्यांनी मिळून माझ्या बाबांना मारून टाकलं; कोरोनानं वडील गमावलेल्या मुलाचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 08:25 IST

CoronaVirus News: शरीरतील ऑक्सिजनची पातळी घसरल्यानं मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडे मदत मागूनही प्रतिसाद नाही

लखनऊ: उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह डझनभरहून अधिक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं संपूर्ण आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. लखनऊमध्ये नुकत्याच घडलेल्या एक हृदयद्रावक घटनेनं याचा प्रत्यय आला. रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा; ‘रेमडेसिविर’ झाले स्वस्त, जाणून घ्या नवी किंमतलखनऊमध्ये वास्तव्यास असलेले मुक्त पत्रकार विनय श्रीवास्तव यांची प्रकृती काल बिघडली. त्यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करून मदत मागितली. कित्येक तास त्यांनी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ३१ पर्यंत पोहोचली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते ६५ वर्षांचे होते. विनय श्रीवास्तव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.बारामतीतील प्रकार! रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून विक्रीविकास नगरमध्ये राहणाऱ्या विनय श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वेगानं कमी घसरत होतं. ऑक्सिजनची पातळी ५२ वर असताना त्यांनी ट्विटरवर योगी आदित्यनाथ यांना टॅग केलं. 'तुमच्या राज्यात डॉक्टर आणि रुग्णालयं निरंकुश झाली आहेत. मी ६५ वर्षांचा आहे. मला स्पाँडिलायसिसचा त्रास आहे. माझ्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ५२ वर आली आहे. कोणतंही रुग्णालय, लॅब आणि डॉक्टर माझा फोन घेत नाहीत,' असं श्रीवास्तव यांनी ट्विटमध्ये म्हटलं.आपण वडिलांना घेऊन अनेक रुग्णालयांमध्ये गेलो होतो. मात्र कोणीही आम्हाला आत येऊच दिलं नाही, असा अतिशय गंभीर आरोप विनय यांचा मुलगा हर्षितनं केला. 'मी वडिलांना घेऊन बऱ्याच रुग्णालयांमध्ये गेलो. पण आधी कोविड चाचणीचा रिपोर्ट आणा. मग उपचार होतील, अशी उत्तरं मला मिळाली. कोविड चाचणीचा अहवाल यायला २४ तास लागतील. त्यामुळे माझ्या वडिलांना आताच दाखल करून घ्या, यासाठी डॉक्टरांकडे विनंती केली. पण कोणीही माझं ऐकलं नाही. सगळ्यांनी मिळून माझ्या वडिलांना मारून टाकलं,' अशा शब्दांत हर्षितनं आक्रोश केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या