शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशात उपचाराधीन रुग्ण संख्येत ५ हजारांनी घट; ३९ हजार कोरोनाबाधित; बरे झाले ४३ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 06:09 IST

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बरे झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. तीन कोटी १९ लाख ३४ हजार ४५५ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १० लाख ९९ हजार ७७१ जण बरे झाले.

नवी दिल्ली : देशात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या २४ तासांत ५ हजारने घटली आहे. सध्या ४ लाख ६ हजार ८३३ जणांवर उपचार सुरू आहेत. या कालावधीत ३९ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले व ४३ हजार जण बरे झाले. या संसर्गाने आणखी ४९१ जणांचा मृत्यू झाला आहे.शनिवारी ४ लाख १२ हजार १५३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बरे झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. तीन कोटी १९ लाख ३४ हजार ४५५ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १० लाख ९९ हजार ७७१ जण बरे झाले. मृतांचा आकडा ४ लाख २७ हजार ८६२ वर पोहोचला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.३९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १.२७ टक्के आहे तर रुग्णांचा मृत्यूदर १.३४ टक्के आहे. कोरोनाचा दररोजचा व आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे २.२७ व २.३८ टक्के आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे ५० कोटी ६८ लाख १० हजार ४९२ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तर ४८ कोटींहून अधिक कोरोना चाचण्या देशात पार पडल्या आहेत.जगभरात २० कोटी ३० लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील १८ कोटी २३ लाख रुग्ण बरे झाले तर ४३ लाख लोकांचा बळी गेला आहे. १ कोटी ६३ लाख रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ९८ हजार लोकांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अमेरिकेत उपचार घेणाऱ्यांची संख्या ६० लाखांवर पोहोचली असून तिथे आजवर ६ लाख ३२ हजार जण मरण पावले. जगात सर्वाधिक रुग्ण म्हणजे ३ कोटी ६५ लाख रुग्ण अमेरिकेत असून त्यातील २ कोटी ९८ लाख जण बरे झाले.इंग्लंडमध्ये फैलाव झाला कमीइंग्लंडमध्ये कोरोना साथीचा फैलाव कमी होऊ लागला आहे. त्या देशाच्या काही भागांत तरुणांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या आठवड्याच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. परिस्थिती सुधारत असली तरी कोरोना प्रतिबंधक नियम आणखी शिथिल करण्यास  इंग्लंडचे सरकार तयार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या