CoronaVirus News : देशात रुग्णांची संख्या सव्वाचार लाखांवर, एका दिवसात १४ हजार ८२१ रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 04:11 IST2020-06-23T04:01:28+5:302020-06-23T04:11:43+5:30
रविवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार त्याआधीच्या २४ तासांत १५ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते.

CoronaVirus News : देशात रुग्णांची संख्या सव्वाचार लाखांवर, एका दिवसात १४ हजार ८२१ रुग्ण सापडले
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत १४ हजार ८२१ नवे रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ४ लाख २५ हजार २८२ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा १३ हजार ७00पार गेला. गेले ११ दिवस देशात रोज १0 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. रविवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार त्याआधीच्या २४ तासांत १५ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. एकट्या जून महिन्यात देशात २ लाख ३४ हजार ७४७ जणांना कोरोनाची बाधा झाली.
नवे रुग्ण आढळत असतानाच बरे होऊ न घरी परतणाऱ्यांची वाढती संख्या ही समाधानाची बाब आहे. आतापर्यंत २ लाख ३७ हजार १९५ जण बरे झाले आहेत आणि सध्या १ लाख ७४ हजार ३८७ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ९४४0 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण ५५.७७ टक्के इतके आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. जगभरातील मृत्यूचे प्रमाण पाहता, भारत आठव्या स्थानी आहे. आतापर्यंत जे १३ हजार ६९९ जण मरण पावले आहेत, त्यात एकट्या महाराष्ट्रातील ६१७0 जण आहेत. आतापर्यंत जे मरण पावले, त्यातील ७0 टक्के जणांना काही ना काही व्याधी होती.
>६९.५0 लाख चाचण्या
चाचण्यांचे प्रमाणही देशात वाढले आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ६९ लाख ५0 हजार ४९३ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. रविवारी देशात १ लाख ४३ हजार २६७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.