CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 04:08 PM2020-05-10T16:08:42+5:302020-05-10T16:21:59+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या होणारी ही  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक ५ वी आहे. 

CoronaVirus News: Narendra Modi will hold video conferencing with all the Chief Ministers rkp | CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.११) दुपारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.११) दुपारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या होणारी ही बैठक ५ वी आहे. 


देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या तिसऱ्या लॉकडाऊनचा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याबाबत निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते. 

आणखी बातम्या...

भारत-चीन सैनिकांमध्ये संघर्ष, सीमेवर काहीकाळ तणावाची परिस्थिती

CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बराक ओबामा भडकले; फोन कॉल लीक

CoronaVirus News : हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेस प्रवक्त्यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली

CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल

Web Title: CoronaVirus News: Narendra Modi will hold video conferencing with all the Chief Ministers rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.