शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : 'या' राज्यांतील लॉकडाऊन शिथिल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 15:57 IST

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अनेक राज्यांकडून सतत केंद्र सरकारने आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहे.गोवा, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, नागालँड या राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे.कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अनेक राज्यांकडून सतत केंद्र सरकारने आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू असलेल्या लॉकडाऊन-३ येत्या १७ मे रोजी संपणार आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहे. त्यामुळे असा अंदाज वर्तविला जाता आहे की, ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्याच राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल. 

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अनेक राज्यांकडून सतत केंद्र सरकारने आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असलेल्या राज्यात आर्थिक हालचालींमध्ये वाढ होण्याची शकता आहे आणि लॉकडाऊनमध्येही मोठा दिलासा मिळू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आपल्या भाषणात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरही बोलतील. कारण, मजूर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक अडचणीत सापडले आहेत.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह झोनचा निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली. अनेक राज्यांनी स्वत: झोन निश्चित करण्याची मागणी केली होती. या बैठकीत 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर गुजरात आणि दिल्लीसारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आर्थिक अॅक्टिव्हिटीज् वाढविण्यासाठी लॉकडाऊनमध्ये  दिलासा देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा पुढील टप्पा हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविली जाण्याची शक्यता आहे. 

गोवा, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, नागालँड या राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांमध्ये (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, झारखंड) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या राज्यांतील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या राज्यांची अर्थव्यवस्था बिघडली तर त्याचा परिणाम थेट केंद्रावर होईल, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात या राज्यांत सूट देऊन योजना शेअर करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिवाय चालणे अशक्य असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा कहर असा आहे की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक घेतले पाहिजे. त्याचबरोबर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन वाढविण्यास पाठिंबा दर्शविला आहे. तामिळनाडूनेही रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यास असहमती दर्शविली आहे. राजस्थानमधून रेड झोनमध्ये पूर्ण बंदी घालण्याची सूचना देण्यात आली आहे. अशाप्रकारे, मोठ्या राज्यांची परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या राज्यांमध्ये काही मोठ्या घोषणा करु शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या