शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 61267 रुग्ण वाढले; 884 जणांचा मृत्यू

By ravalnath.patil | Published: October 06, 2020 10:48 AM

CoronaVirus News : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 66 लाख 49 हजारांवर पोहोचली.

ठळक मुद्दे देशातील रुग्णांचा आकडा 66 लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील रुग्णांचा आकडा 66 लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61,267 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 884 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 66 लाख 49 हजारांवर पोहोचली. आतापर्यंत 1 लाख 3 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 75 हजार 675 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 56 लाख 62 हजार 491 लोक बरे झाले आहेत. गेल्या 26 दिवसांत, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 10.17 लाखांवरून ती 9.19 लाखांवर पोहोचली आहे. देशात सध्या 9 लाख 19 हजार 023 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत कोरोनाचा धोका कायम असल्याची माहिती आता समोर आली आहे. सध्या सण-समारंभाचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात मास्क घालूनच सर्व सण साजरे करावेत असा सल्ला केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे. 

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्केमहाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी दिवसभरात 12 हजार 982 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत 11 लाख 62 हजार 585 रुग्ण कोविडमुक्त झाले. दिवसभरात 10 हजार 244 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 263 मृत्यूंची नोंद झाली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर 2.64 टक्के आहे. सध्या 2 लाख 52 हजार 277 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 53 हजार 653 वर पोहोचली असून बळींचा आकडा 38 हजार 347 झाला आहे. सध्या 22 लाख 160 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 26 हजार 749 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

केंद्र सरकारने दिला मोलाचा सल्लासण-समारंभ असल्याने लोक एकमेकांना भेटण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळी मास्क लावण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) दुसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरदरम्यान हे सीरो सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामध्ये 10 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार 6.6 टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत