CoronaVirus News: कोरोना निर्बंध उद्योगांच्या मुळावर? जमावबंदी, संचारबंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 07:59 AM2022-01-19T07:59:11+5:302022-01-19T07:59:38+5:30

अनेक राज्यांनी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी असे निर्बंधांचे सूत्र अवलंबले. त्यामुळे उद्योगांना नुकसान सहन करावे लागत आहे.

CoronaVirus News industry suffering due to restrictions in many states | CoronaVirus News: कोरोना निर्बंध उद्योगांच्या मुळावर? जमावबंदी, संचारबंदीचा फटका

CoronaVirus News: कोरोना निर्बंध उद्योगांच्या मुळावर? जमावबंदी, संचारबंदीचा फटका

googlenewsNext

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्याने बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी असे निर्बंधांचे सूत्र अवलंबले. त्यामुळे उद्योगांना नुकसान सहन करावे लागत आहे.

 ‘केट’चे म्हणणे...
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांमुळे देशांतर्गत उद्योगाला फटका बसला आहे.
कोरोना निर्बंधांमुळे देशभरातील व्यापार-उदिम थंडावला असल्याचा निष्कर्ष कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी-केट) यांनी काढला आहे.

गेल्या १५ दिवसांत उद्योग-
व्यवसायांची उलाढाल ५० टक्क्यांवर आल्याचे ‘केट’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
निर्बंध शिथिल केले जावेत, अशी ‘केट’ची मागणी आहे.

विवाह व्यवस्थापन क्षेत्राचे नुकसान
नव्या कोरोना निर्बंधांचा सर्वाधिक फटका विवाह व्यवस्थापन क्षेत्राला बसला आहे.
येत्या दोन-तीन महिन्यांत या क्षेत्राला ४ लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा होती.
परंतु विविध राज्यांनी लादलेले विविध निर्बंध येत्या काळात कायम राहिल्यास या व्यवसायाचे अडीच लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

सर्वेक्षण कुठे केले?
कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी १ ते १५ जानेवारी या कालावधीत देशभरातील ३६ शहरांमध्ये सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणातूनच कोरोना निर्बंधांमुळे उद्योगांचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले.
कोरोना निर्बंधांची स्थिती अशीच राहिल्यास संपूर्ण उद्योगचक्राला त्याचा फटका बसेल, असाही निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला.

Web Title: CoronaVirus News industry suffering due to restrictions in many states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.