CoronaVirus News: सवलतींसह वाढला लॉकडाऊन, १७ मे आता नवीन तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:22 AM2020-05-02T06:22:57+5:302020-05-02T06:23:21+5:30

फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क असणे मात्र देशभरात बंधनकारक असेल. मुंबई, पुणे व दिल्ली रेड झोनमध्ये असल्याने तेथील नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही.

CoronaVirus News: Increased lockdown with discounts, May 17 is now a new date | CoronaVirus News: सवलतींसह वाढला लॉकडाऊन, १७ मे आता नवीन तारीख

CoronaVirus News: सवलतींसह वाढला लॉकडाऊन, १७ मे आता नवीन तारीख

Next

नवी दिल्ली : देशभर लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात ४ ते १७ मे दरम्यान लॉकडाऊन कायम असेल. मात्र रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये विभागणी करून जनजीवन सुरळीत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शिका प्रसिद्ध करत रहिवाशांना सूट दिली आहे. ग्रीन झोनमधील प्रमुख आर्थिक व्यवहारांना परवानगी देताना रेड झोनमध्ये मात्र निर्बंध वाढवले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क असणे मात्र देशभरात बंधनकारक असेल. मुंबई, पुणे व दिल्ली रेड झोनमध्ये असल्याने तेथील नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रुग्णसंख्या कमी होत जाण्यासाठी तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली. २१ एप्रिलला जारी केलेल्या मार्गदर्शिकेमुळे अनेक दुकाने उघडली होती. ग्रामीण भागातील व्यवहार पूर्वपदावर येत होते.
>ग्रीन झोन : याआधीच रहिवासी व व्यापारी संकुलातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. आता अशा जिल्ह्यांमध्ये शहरांतर्गत बस धावू शकेल. मात्र त्यात आसनक्षमतेच्या ५०% प्रवासी त्यातून प्रवास करू शकतील. खासगी वाहनातून आंतरजिल्हा प्रवासासाठी केवळ वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक. दुकाने उघडण्यासही मुभा. खासगी कॅबला परवानगी. मद्यविक्रीस परवानगी.
>आॅरेंज झोन : या विभागात जिल्ह्यातील कंटेनमेंट क्षेत्रास कोणतीही सूट नसेल. उर्वरित भागात ओला, उबेरसह खासगी टॅक्सी वाहतुकीस परवानगी. मात्र चालकासह २ जणांना प्रवास करता येईल. खासगी चारचाकीसाठीही हा नियम कायम असेल. औद्योगिक वसाहतीत नियम पाळून काम सुरू करता येईल.
>रेड झोन : जीवनावश्यक वस्तू व औषध वाहतुकीला परवानगी. सायकल रिक्षा, आॅटो रिक्षा, खासगी टॅक्सीसह ओला, उबरला परवानगी नाही. खासगी वाहनातून चालकासह दोघांना परवानगी. दुचाकीवर एकच जण. विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग, वैद्यकीय उपकरणे, औषध निर्माण व ई-कॉमर्सवरून जीवनावश्यक वस्तू तसेच खासगी कार्यालयांत ३३ टक्के कर्मचाºयांना परवानगी.
>नागरिकांची जबाबदारी : सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांत फेस मास्क बंधनकारक. पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही. अंंत्ययात्रेत २० जणांना सहभागी होता येईल. कामाच्या ठिकाणी परस्परांपासून अंतर राखणे आवश्यक.
>देशातील जिल्ह्यांची विभागणी
130
रेड झोन
284
आॅरेंज झोन
319
ग्रीन झोन
>हे बंदच : विमान, रेल्वे, आंतरराज्य बस, मेट्रो, आंतरराज्य प्रवास, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, हॉटेल्स, रेस्तराँ, क्रीडा संकुल, धार्मिक ठिकाणे, प्रार्थनास्थळे. सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यावर निर्बंध. रेड व आॅरेंज झोनमधील परिसरात जमावबंदी कायद्याचे पालन. केश कर्तनालय.

Web Title: CoronaVirus News: Increased lockdown with discounts, May 17 is now a new date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.