शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

CoronaVirus News : कोरोना लस मिळाली तरी भारतात लसीकरणासाठी कमीत कमी लागणार २ वर्षे, वैज्ञानिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 15:56 IST

'हर्ड इम्युनिटी' सुनिश्चित करण्यासाठी किमान 60 ते 70 टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी तयारीत आहे. जगातील सर्व देशांप्रमाणेच कोरोना व्हायरस भारतातही सर्वत्र पसरतो आहे. त्यामुळे भारतातही कोरोना व्हायरसवर लस बनवण्याचे काम सुरू आहे. देशातील वैद्यकीय तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, ही लस लवकरच तयार केली गेली असली तरी भारतातील 60-70 टक्के लोकसंख्येच्या लसीकरणासाठी किमान दोन वर्षे लागतील. 'हर्ड इम्युनिटी' सुनिश्चित करण्यासाठी किमान 60 ते 70 टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक आहे.डिसेंबरपर्यंत आपल्याला लस मिळाली तर…कोरोनावरील दिल्ली सरकारच्या पॅनेलचे सदस्य, मॅक्स हेल्थकेअरचे डॉक्टर संदीप बुधीराजा यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, "जर आपण दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले, तर आपल्याला 60 ते 70 टक्के लोकसंख्येची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जरी आम्हाला डिसेंबरपर्यंत कोरोनाची लस मिळाली, तर भारतातील 60 टक्के लोकसंख्येपर्यंत लसीकरण करण्यासाठी एक ते अडीच वर्षे लागेल.'...तर इतर आजारांप्रमाणे कोरोनाबरोबरही जगावं लागेलबुधीराजाच्या मते, ज्याप्रमाणे आपण टीबीसारख्या आजाराशी झगडत जगलो, तसेच देशाला कोरोना व्हायरससोबत जगावे लागेल. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, भारतात सार्वत्रिक लसीकरण आधीपासूनच एक मोठे आव्हान आहे. दिल्ली-एनसीआरमधील कोविड हॉस्पिटल चालवणारे आकाश हेल्थकेअरचे डॉक्टर आशिष चौधरी म्हणतात, "सरकारी अहवालानुसार, सर्व प्रयत्न करूनही त्या गटातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त लस 2 वर्षांखालील मुलांमध्ये अनिवार्य प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी द्यावी लागेल." .वेगाने व्हायरस बदलतोय रूप, एक लस मुळीच प्रभावी ठरणार नाहीएकाच लशीबद्दलही शंका आहे, जी सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. टेलिमेडिसीनला भारतात एक नवीन ओळख देणारे अपोलो टेलिहेल्थचे गणपती म्हणतात, “डिसेंबर २०१९ ते जून २०२० पर्यंत या विषाणूनं रूप बदलले आहे. आता स्पेनमध्ये त्याचे रूप कसे होते, इटलीमध्ये त्याचे रूप कसे होते आणि भारतात त्याचे रूप कसे आहे यावरही बरंच काही अवलंबून असतं. आमची प्रतिकारशक्ती वेगळी आहे. 'कोविडच्या आता 6 ट्रेन्स, एकाच वेळी एक लस एका ट्रेन्सवर ठरेल प्रभावीही लस सर्वांना उपलब्ध असल्याबद्दल तज्ज्ञांना शंका आहे. डॉक्टर चौधरी म्हणतात, 'कोरोना विषाणूचे 6 प्रकार आहेत आणि एका वेळी केवळ एकाच ट्रेन्सविरुद्ध लस प्रभावी ठरेल. इतर स्ट्रेन्सच्या वापरासाठी लसमध्ये काही बदल आवश्यक आहेत. 20 वर्षांपूर्वी SARSवर अद्याप लस उपलब्ध नाही. कोरोना लस लवकरच तयार होईल की नाही, याची तज्ज्ञांना खात्री नाही. डॉ. गणपती म्हणतात, आमच्याकडे अद्याप सार्स विषाणूवरची लस तयार झालेली नाही, जी साथ 20 वर्षांपूर्वी प्रथम पसरली होती.

हेही वाचा

LICच्या 'या' योजनेवर मिळतेय 15 टक्क्यांपर्यंत व्याज, फक्त एकच अट!

CoronaVirus News: विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोना, अधिवेशनाच्या तोंडावर खळबळ

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार

लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत 

म्युच्युअल फंडाची जबरदस्त योजना; रातोरात वाढणार संपत्ती, जाणून घ्या...

चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत; UPमध्ये मोठा रोजगार उपलब्ध होणार

कार अन् बाइक Insuranceशी संबंधित नियम बदलणार, १ ऑगस्टपासून लागू होणार

UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार

फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस