lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार

बुधवारी भारतीय बाजारात एक किलो चांदीची किंमत 61,200 रुपये होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 12:59 PM2020-07-22T12:59:00+5:302020-07-22T12:59:31+5:30

बुधवारी भारतीय बाजारात एक किलो चांदीची किंमत 61,200 रुपये होती.

gold prices in india silver rise at rs 61150 per kg in india today | सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात सोने-चांदी(Gold-Silver Prices)च्या किमतींमध्ये मोठी वाढ होत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या जोरदार वाढीमुळे भारतीय बाजारपेठेत चांदीची किंमत (Silver Prices Today) 61 हजार रुपये प्रति किलोच्या पार गेली आहे. तर सोन्या(Gold Prices) च्या किमतीनंही प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. बुधवारी भारतीय बाजारात एक किलो चांदीची किंमत 61,200 रुपये होती. गेल्या सात वर्षांत चांदीची ही सर्वाधिक किंमत आहे. मार्चमध्ये नीचांकीपेक्षा चांदीच्या भावात 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्याचबरोबर सन 2020मध्ये 30 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कोरोना व्हायरस(Coronavirus)च्या प्रादुर्भावात वाढ झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार मालमत्तेऐवजी सोन्यात गुंतवणूक करत आहे. ज्याने सोने आणि चांदीच्या किमतींनी कायमचे उच्चांक गाठले आहेत.
बुधवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)वर चांदीच्या सप्टेंबरच्या कालबाह्य अनुबंधात तो मागील सत्राच्या तुलनेत 3208 रुपये म्हणजेच 5.59 टक्क्यांनी वाढून 61,150 रुपयांवर गेला होता. एमसीएक्सवर चांदीचा भाव 58,000 रुपयांवर उघडला आणि ट्रेडिंगदरम्यान चांदी 61,200 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली.

चांदीचे दर का वाढले?
एंजल ब्रोकिंग कमोडिटीचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की, कोरोना कालावधीत गुंतवणूकदारांची सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वाढ ही सोन्या-चांदीच्या किमतींना आधार देणारी ठरली आहे. कोरोनामुळे खाणकामांवर परिणाम झाला आणि पुरवठा खंडित झाला. चांदीच्या किमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत चांदीची किंमत प्रति किलो 62 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सोन्यानेही 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला
एमसीएक्समध्ये सोन्याच्या किमतींमध्येही वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 49,931वर उघडला आणि व्यापारादरम्यान दहा ग्रॅम 50,077 रुपयांवर पोहोचला. अनुज गुप्ता म्हणतात की, सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होईल. एका महिन्यात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51 हजार ते 52 हजार रुपये पातळीपर्यंत पोहोचू शकते.

हेही वाचा

लडाखच्या LACवर चीनच्या हालचालींवर 'भारत' ड्रोनच्या मदतीनं ठेवणार नजर; जाणून घ्या खासियत 

म्युच्युअल फंडाची जबरदस्त योजना; रातोरात वाढणार संपत्ती, जाणून घ्या...

चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत; UPमध्ये मोठा रोजगार उपलब्ध होणार

कार अन् बाइक Insuranceशी संबंधित नियम बदलणार, १ ऑगस्टपासून लागू होणार

UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार

फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'

देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

Web Title: gold prices in india silver rise at rs 61150 per kg in india today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.