CoronaVirus News: "आकड्यांमध्ये जाऊ नका, आकांडतांडव करून मेलेली माणसं जिवंत होणार नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:18 IST2021-04-27T15:15:35+5:302021-04-27T15:18:48+5:30
CoronaVirus News: हरयाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांचं विधान

CoronaVirus News: "आकड्यांमध्ये जाऊ नका, आकांडतांडव करून मेलेली माणसं जिवंत होणार नाहीत"
चंदिगढ: गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधील परिस्थिती भीषण होत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांपर्यंत अनेकांनी भारतातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर आहे. हरयाणादेखील याला अपवाद नाही. मात्र या परिस्थितीवर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं आहे.
कोरोना संकटात मोठी मदत; इंग्लंडमधून भारतात पोहोचली 100 व्हेंटिलेटर, 95 ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेप
हरयाणातील कोरोना स्थिती, मृतांचा आकडा, त्यातील लपवाछपवी याबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ही वेळ आकड्यांवर लक्ष देण्याची नाही. आमच्या आकांडतांडवानं मेलेली माणसं जिवंत होणार नाहीत, असं वक्तव्य खट्टर यांनी केलं. रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा कशा पोहोचतील याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आम्ही त्याच उद्देशानं सध्या प्रयत्न करत आहोत, असं खट्टर म्हणाले.
भयावह! मृत्यूनंतर तब्बल 21 तास घरातच पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह; मग झालं असं काही...
राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही. रुग्णांना हरतऱ्हेच्या सुविधा देण्यास राज्य सरकारचं प्राधान्य दिलं जात असल्याचं खट्टर यांनी सांगितलं. राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी खट्टर यांनी रोहतक, पानीपत, फरिदाबादचा दौरा केला. रेवाडी, गुरुग्राम आणि हिसारमध्ये गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यावर राज्यात कुठेही वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती खट्टर यांनी दिली.