CoronaVirus News : coronavirus positive boy died after 3 hospitals refused to admit in kolkata | CoronaVirus News : 3 रुग्णालयांनी नाकारलं; आईच्या आत्महत्येच्या धमकीनंतर मुलाला चौथ्या रुग्णालयानं स्वीकारलं, पण...

CoronaVirus News : 3 रुग्णालयांनी नाकारलं; आईच्या आत्महत्येच्या धमकीनंतर मुलाला चौथ्या रुग्णालयानं स्वीकारलं, पण...

कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतावरही मोठं संकट आहे. अशा परिस्थितीत देशातील रुग्णालयांमध्ये कोरोना संक्रमित लोकांच्या उपचारांसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. परंतु हे दावे फोल ठरत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. काही रुग्णालये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखलच करून घेत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. कोलकातामध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे. तिथे बारावीत शिकणार्‍या 18 वर्षांच्या विद्यार्थ्याचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. त्याच्या उपचारासाठी तीन रुग्णालयांनी प्रवेश नाकारला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यानंतर जेव्हा त्याच्या आईने आत्महत्येची धमकी दिली, तेव्हा चौथ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

18 वर्षीय सुब्रजित चट्टोपाध्याय हा विद्यार्थी 12 वीत शिकत होता. त्यालाही मधुमेहचा त्रास होता. कालांतरानं त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तीन रुग्णालयांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रात्री त्याला आईने आत्महत्या करण्याची धमकी दिल्यानंतर कोलकाता मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

आरोग्य सेवा संचालक अजय चक्रवर्ती म्हणाले की, या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष दिले पाहिजे. त्याचवेळी विद्यार्थ्याचे वडील म्हणाले, 'मुलाला मधुमेह होता. शुक्रवारी सकाळी त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता. यानंतर आम्ही त्याला ईएसआय रुग्णालयात नेले. पण त्यांच्याकडे कोणताही आयसीयू बेड उपलब्ध नाही, असं त्यांनी सांगितलं.  वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्यानंतर आम्ही त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये नेले. त्याच्या कोरोनाची चाचणी तिथे करण्यात आली. जेव्हा अहवाल सकारात्मक आला तेव्हा बेड उपलब्ध नसल्याचे सांगत नावनोंदणीस रुग्णालयानं नकार दिला. यावेळी आम्ही रुग्णवाहिकेत थांबलो होतो. विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, “आम्ही मुलाला सागर दत्ता या सरकारी रुग्णालयात नेले होते. आम्हाला तिथेही नकार देण्यात आला. यानंतर आम्ही पोलिसांकडे गेलो, तेव्हा पोलिसांनी आम्हाला केएमसीएचमध्ये जाण्यास सांगितले. तिथे मी आत्महत्येची धमकी दिली असता, रुग्णालयाने त्याला भरती करून घेतले.

वडील म्हणाले, 'माझ्या मुलाला रुग्णालयात औषध दिले जात नव्हते. त्याला एका वॉर्डात नेण्यात आले जेथे आम्हाला प्रवेश नव्हता. आम्ही सतत त्याचे आरोग्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो, पण कोणीही त्याबद्दल आम्हाला सांगत नव्हते. जेव्हा आम्ही चौकशी काऊंटरवर गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की रात्री 9.30 च्या सुमारास मुलाचा मृत्यू झाला. ते म्हणतात की, जर रुग्णालयात मुलाला योग्य वेळी दाखल केले असते तर मुलाचा मृत्यू झाला नसता.

हेही वाचा

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

CoronaVirus News : पुनश्च 'होम'! 'या' प्रश्नांची उत्तरे मिळणार का? 

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह

...म्हणून अशानं दोन देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात, शरद पवारांचा मोदींना सल्लावजा टोला

CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : coronavirus positive boy died after 3 hospitals refused to admit in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.