CoronaVirus News : कोरोना साथीने घेतले नवे धोकादायक वळण, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:18 IST2020-06-21T05:01:35+5:302020-06-21T06:18:23+5:30
CoronaVirus News : भारतामध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १४ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या सुमारे चार लाख झाली आहे.

CoronaVirus News : कोरोना साथीने घेतले नवे धोकादायक वळण, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली : संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोनाच्या साथीने आता नवे धोकादायक वळण घेतले आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना दिला आहे. भारतामध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १४ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या सुमारे चार लाख झाली आहे.
देशात कोरोनामुळे आणखी ३७५जणांचा बळी गेला असून त्यामुळे मृतांची एकूण संख्या सुमारे १३ हजार झाली आहे. सध्या १ लाख ६८ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २,१३,८३० रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी ५४.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. लॉकडाऊन शिथिल करून देशातील जनजीवन आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सरु असतानाच बाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांच्या चिंतेतही भर पडत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसिस यांनी सांगितले की, कोरोना साथ पुन्हा मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा धोका असल्याने सर्व देश व तेथील नागरिकांनी अतिशय सावध राहिले पाहिजे.