शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
6
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
7
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
8
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
9
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
10
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
11
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
12
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
13
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
14
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
15
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
16
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
17
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
18
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
19
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
20
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव

CoronaVirus News: बाटलीत मूत आणि त्यानंच हात धू; सॅनिटायझर मागणाऱ्या कोरोना रुग्णाला अधिकाऱ्याचं उर्मट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:45 IST

CoronaVirus News: कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना पंचायत सचिवाचं उद्धट उत्तर; कोविड सेंटरमध्ये गोंधळ

धमतरी: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. यामुळे आरोग्य सुविधांवर मोठा ताण आहे. अनेकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्णांना मदतीची गरज असताना काही अधिकारी त्यांच्याशी अतिशय उर्मटपणे बोलत असल्याचं, गैरवर्तन करत असल्याचं दिसून येत आहेत. छत्तीसगढच्या धमतरीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.धमतरीमधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांनी पंचायत सचिवांकडे हात धुण्यासाठी सॅनिटायझर आणि साबण सांगितला. यावर सचिवांनी अतिशय उद्धटपणे उत्तर दिलं. त्यांनी कोरोना रुग्णांना मूत्र वापरण्याचा सल्ला दिला. पंचायत सचिवांच्या उर्मट सल्ल्यामुळे रुग्ण संतापले. त्यांनी कोविड सेंटरमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला.Fact Check: कोरोनाची 'थर्ड स्टेज' अन् कलेक्टरच्या 'त्या' २० सूचना; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्यधमतरीच्या लटियारा पंचायतीत हा प्रकार घडला. इथल्या कोविड सेंटरमधील आयसोलेशनमध्ये ६ रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी रुग्णांना साबण आणि सॅनिटायझरची बाटली देण्यात आली होती. मात्र ती संपल्यानंतर रुग्णांना साबण किंवा सॅनिटायझर देण्यात आलं नाही. रुग्णांनी याबद्दल तक्रार करण्यासाठी पंचायत सचिवांना फोन केला. त्यांना सचिवांकडे सॅनिटायझरची मागणी केली. त्यावेळी संतापलेल्या सचिवानं उर्मट उत्तरं दिली.काळीज पिळवटणारी घटना! मुलाचा विरह सहन होईना; व्याकुळ आई चितेच्या राखेतच झोपतेसॅनिटायझर नसल्यानं कोविड सेंटरमधील रुग्णांनी पंचायत सचिवाकडे सॅनिटायझरची मागणी केली. त्यावर सर्वांनी मूत्र बाटलीत भरा आणि तेच सॅनिटायझरसारखं वापरा, असा किळसवाणा सल्ला पंचायत सचिवानं दिला. हे उत्तर ऐकून रुग्ण संतापले आणि त्यांनी कोविड सेंटरमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर पंचायत सचिवानं चूक मान्य केली आणि हात जोडून माफी मागितली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या