CoronaVirus News: बाटलीत मूत आणि त्यानंच हात धू; सॅनिटायझर मागणाऱ्या कोरोना रुग्णाला अधिकाऱ्याचं उर्मट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:45 IST2021-05-12T15:41:26+5:302021-05-12T15:45:33+5:30
CoronaVirus News: कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना पंचायत सचिवाचं उद्धट उत्तर; कोविड सेंटरमध्ये गोंधळ

CoronaVirus News: बाटलीत मूत आणि त्यानंच हात धू; सॅनिटायझर मागणाऱ्या कोरोना रुग्णाला अधिकाऱ्याचं उर्मट उत्तर
धमतरी: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. यामुळे आरोग्य सुविधांवर मोठा ताण आहे. अनेकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्णांना मदतीची गरज असताना काही अधिकारी त्यांच्याशी अतिशय उर्मटपणे बोलत असल्याचं, गैरवर्तन करत असल्याचं दिसून येत आहेत. छत्तीसगढच्या धमतरीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
धमतरीमधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांनी पंचायत सचिवांकडे हात धुण्यासाठी सॅनिटायझर आणि साबण सांगितला. यावर सचिवांनी अतिशय उद्धटपणे उत्तर दिलं. त्यांनी कोरोना रुग्णांना मूत्र वापरण्याचा सल्ला दिला. पंचायत सचिवांच्या उर्मट सल्ल्यामुळे रुग्ण संतापले. त्यांनी कोविड सेंटरमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला.
Fact Check: कोरोनाची 'थर्ड स्टेज' अन् कलेक्टरच्या 'त्या' २० सूचना; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य
धमतरीच्या लटियारा पंचायतीत हा प्रकार घडला. इथल्या कोविड सेंटरमधील आयसोलेशनमध्ये ६ रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी रुग्णांना साबण आणि सॅनिटायझरची बाटली देण्यात आली होती. मात्र ती संपल्यानंतर रुग्णांना साबण किंवा सॅनिटायझर देण्यात आलं नाही. रुग्णांनी याबद्दल तक्रार करण्यासाठी पंचायत सचिवांना फोन केला. त्यांना सचिवांकडे सॅनिटायझरची मागणी केली. त्यावेळी संतापलेल्या सचिवानं उर्मट उत्तरं दिली.
काळीज पिळवटणारी घटना! मुलाचा विरह सहन होईना; व्याकुळ आई चितेच्या राखेतच झोपते
सॅनिटायझर नसल्यानं कोविड सेंटरमधील रुग्णांनी पंचायत सचिवाकडे सॅनिटायझरची मागणी केली. त्यावर सर्वांनी मूत्र बाटलीत भरा आणि तेच सॅनिटायझरसारखं वापरा, असा किळसवाणा सल्ला पंचायत सचिवानं दिला. हे उत्तर ऐकून रुग्ण संतापले आणि त्यांनी कोविड सेंटरमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर पंचायत सचिवानं चूक मान्य केली आणि हात जोडून माफी मागितली.