शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

CoronaVirus News : हृदयविकार, मधुमेहींसाठी कोरोना जीवघेणा; आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:55 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : हृदय व रक्तवाहिनाशी संबंधित गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या खालोखाल मधुमेह असताना कोरोना झाल्यास अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ९.२ टक्के आहे.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : हृदय कमजोर असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. कोरोना हा जीवघेणा आजार नसला तरी उपचारास विलंब व आधीचे गंभीर आजार असलेल्यांना कोरोनाचा जास्त धोका असतो. हृदय व रक्तवाहिनाशी संबंधित गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या खालोखाल मधुमेह असताना कोरोना झाल्यास अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ९.२ टक्के आहे. त्यामुळे जगभरातील तज्ज्ञांनी आरोग्यदायी जीवनशैलीवरच भर दिला आहे. कोणताही आजार नसल्यास कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.श्वसनविकार, दमा, अस्थमा, ब्रोंकायटीस असलेल्यांना कोरोना झाल्यास अशा रुग्णांची अवस्था बिकट होते. या श्रेणीत ८ टक्के रुग्णांचा अंत आतापर्यंत झाला आहे. कर्करोग व त्यातून बरे झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्यास अशांमध्ये मृत्यूदर ७.६ आहे. व्यस्त जीवनशैली, जंक फूड, व्यायामाचा अभाव, कामातील स्पर्धा, चंगळवादामुळे नव्या मानसिक आजारांचा विळखा घट्ट होत चालला आहे.हायपरटेंशन असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त आहे. अशावेळी कोरोनामुळेच घात होण्याची भिती वर्तवली जात आहे. या रुग्णांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय ८.४ टक्के इतके आहे.विशेष म्हणजे जन्मजात रोगप्रतिकार शक्तीमुळे ० ते ९ वयोगटातील रुग्णांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. सर्वाधिक मृत्यू ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना रुग्णांचे झालेत. जगभरात हे प्रमाण २१.९ टक्के इतके आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या