शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

CoronaVirus News : केजरीवालांच्या विरोधानंतर वादग्रस्त आदेश मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 02:25 IST

केंद्रात पाच दिवसांच्या ‘क्वारंटाईन’मध्ये राहण्याची सक्ती करणारा वादग्रस्त आदेश दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल यांनी शनिवारी सायंकाळी अखेर मागे घेतला.

नवी दिल्ली : चाचणी ‘पॉझिटिव’ आलेल्या परंतु लक्षणे दिसत नसलेल्या अथवा अगदी सौम्य लक्षणे दिसत असलेल्या दिल्लीतील प्रत्येक कोरोना रुग्णाला विलगीकरणासाठी स्वत:च्या घरी न राहता एखाद्या इस्पितळात किंवा अन्य कोविड केंद्रात पाच दिवसांच्या ‘क्वारंटाईन’मध्ये राहण्याची सक्ती करणारा वादग्रस्त आदेश दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल यांनी शनिवारी सायंकाळी अखेर मागे घेतला.दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या आदेशावरून चांगलीच खडाजंगी झाली. नायब राज्यपाल या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत नायब राज्यपालांच्या या आदेशास कडाडून विरोध केला. सकाळच्या बैठकीत यातून काही तोडगा न निघाल्याने सायंकाळी पुन्हा बैठक झाली. त्यानंतर नायब राज्यपालांनी सुधारित आदेश काढण्यात येत असल्याचे टष्ट्वीट केले. सुधारित आदेशानुसार ज्या कोरोना रुग्णांना त्यांच्या घरी स्वतंत्रपणे वेगळे राहण्याची सोय नाही त्यांनाच इस्पितळ किंवा कोविड केंद्रात ‘क्वारंटाईन’मघ्ये ठेवता येईल.केजरीवाल यांचे म्हणणे असे होते की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केलेल्या नियमांनुसार अशा रुग्णांना घरी विलगीकरण करून राहण्याची मुभा असताना फक्त दिल्लीसाठी वेगळा नियम कशासाठी? आधीच गंभीर कोराना रुग्णांसाठी दिल्लीमध्ये खाटांची कमतरता भासत आहे. त्यात अशा रुग्णांची भर पडली तर दिल्ली प्रशासनाला पुरेशा खाटांची व्यवस्था करणे अशक्य होईल.दिल्लीमध्ये १० हजारांहून अधिक रुग्णांना घरातच विलगीकरणात राहाण्याची परवानगी केजरीवाल सरकारने दिली होती. मात्र त्यामुळे शहरामध्ये या साथीचा आणखी फैलाव होण्याची भीती केंद्र सरकारला वाटत होती. त्यामुळे नायब राज्यपालांनी हा आदेश काढला होता. मात्र, आम आदमी पक्षाने जोरदार विरोध केल्याने हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.>...जणू त्याचीच परतफेडदिल्लीत सार्वजनिक रुग्णालयांतील खाटा फक्त दिल्लीतील कोरोना रुग्णांसाठी राखून ठेवण्याचा केजरीवाल यांचा आदेश नायब राज्यपालांनी गेल्या आठवड्यात रद्द केला होता. केजरीवाल यांनीत्यांचा निर्णय मान्य केला होता. नायब राज्यपालांनी जणू त्याची परतफेड केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्या