CoronaVirus News : चीन : रहस्यमय न्यूमोनियाच कोरोना; ‘लोकमत’ने सर्वात आधी दिले होते वृत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 06:59 IST2020-07-12T03:04:26+5:302020-07-12T06:59:49+5:30
चीनमध्ये जानेवारीच्या मध्यात कोरोनाचे ४१ रुग्ण होते. वुहान शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. सुरुवातीला रुग्णांवर उपचार करणारे अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले होते.

CoronaVirus News : चीन : रहस्यमय न्यूमोनियाच कोरोना; ‘लोकमत’ने सर्वात आधी दिले होते वृत्त
बीजिंग : चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा प्रसार झाल्याचे सांगितले जाते. अर्थात, कोरोनाचा पहिला रुग्ण नोव्हेंबरच्या मध्यात आढळल्याचे सांगितले जात असले तरी न्यूमोनियासारख्या लक्षणांचे रुग्ण चीनमध्ये या काळात सातत्याने आढळत होते. चीनच्या वुहान शहरात एका ६१ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १२ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते.
चीनमध्ये जानेवारीच्या मध्यात कोरोनाचे ४१ रुग्ण होते. वुहान शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. सुरुवातीला रुग्णांवर उपचार करणारे अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले होते.
५ जानेवारी रोजी वुहानमध्ये व्हायरल न्यूमोनियाचे ५९ रुग्ण आढळले होते. ज्या वुहान शहरात कोरोनाचा फैलाव झाला त्या शहराची लोकसंख्या १ कोटीवर आहे. सुरुवातीला असेही सांगितले जात होते की, या आजाराचे रुग्ण हे अशा भागात सापडले आहेत, ज्या भागात तितर, साप, ससा यांची विक्री होते. न्यूमोनियासारख्या आजाराचा फैलाव झाल्यानंतर हे बाजार बंद करण्यात आले.
- 1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूनंतरची ही सर्वात मोठी साथ समजली जात आहे. कोविड-१९ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आजारात ताप, सर्दी ही लक्षणे दिसून येतात, तर न्यूमोनियासारखी गंभीर परिस्थिती काही रुग्णांच्या बाबतीत उत्पन्न होऊ शकते.