शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

CoronaVirus News: महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाबला केंद्रीय तुकड्या भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 5:19 AM

स्थानिक प्रशासनाला करणार मदत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाचा वेगाने होत असलेला फैलाव पाहता ५० उच्च पातळीवरील सार्वजनिक आरोग्य तुकड्या स्थापन केल्या असून, त्यांची नियुक्ती महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमधील ५० जिल्ह्यांत केली आहे. या तिन्ही राज्यांत गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूही मोठ्या संख्येने वाढले आहेत.या तुकड्या महाराष्ट्रातील ३०, छत्तीसगडमधील ११ आणि पंजाबमधील नऊ जिल्ह्यांत जात असून त्या तेथे राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाला कोविड-१९ देखरेख, नियंत्रण आणि कंटेन्मेंटच्या उपाययोजनेत मदत करतील. दोन सदस्यांच्या उच्च पातळीवरील तुकडीत क्लिनिशियन- एपिडिमओलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आहे. या तुकड्या ताबडतोब राज्यांना भेट देतील आणि कोविड-१९ व्यवस्थापनच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील. विशेषत: चाचण्या, देखरेख आणि कंटेन्मेंट ऑपरेशन्स, कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर आणि त्याची अंमलबजावणी, रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स, प्राणवायूचा पुरवठा इत्यादींचा त्यात समावेश आहे.आरोग्य सामुग्रींचा अहवाल देणार! nभारत सरकारचे तीन ज्येष्ठ अधिकारी वरील तीन राज्यांसाठी नोडल अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. गृहनिर्माण आणि नागरी कामकाज मंत्रालयातील जॉइंट सेक्रेटरी कुणक कुमार हे महाराष्ट्राचे नोडल अधिकारी आहेत. उच्च पातळीवरील तुकड्या या तीन राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय राखून त्यांना अहवाल देतील. nया तुकड्या राेजच्या रोज चाचण्या, काँटॅक्ट ट्रेसिंग, देखरेख आणि कंटेन्मेंट, रुग्णालयातील पायाभूत सुविधा, आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडस, लसीकरण या मुद्यांवर अहवाल सादर करतील.nकेंद्र सरकार कोविड-१९ व्यवस्थापनासाठी वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांशी समन्वय राखून लढत आहे. केंद्र सरकार वेळोवेळी केंद्रीय तुकड्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत पाठवत आहे. परिस्थितीची व आव्हानांची नेमकी माहिती मिळण्यासाठी या तुकड्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात असतात. तसेच त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत याची माहिती घेतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या