शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Corona Vaccination: लसीकरणात राजकारण! मोदी सरकारच्या पक्षपातामुळे महाराष्ट्रावर अन्याय; पाहा आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 5:58 AM

Corona Vaccination: भाजपशासित राज्यांना अधिक डोस; ६ कोटी लोकसंख्येच्या गुजरातला १५ लाख, तर महाराष्ट्राला १७ लाख डोस

- अतुल कुलकर्णीमुंबई : ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे त्या राज्याला कोरोना लसीचे १७ लाख ४३ हजार २८० डोस तर ज्या गुजरातची लोकसंख्या ६ कोटी आहे त्या राज्याला मात्र १५ लाख ५७ हजार ८७० डोस येत्या पाच दिवसात मिळणार आहेत. केंद्र सरकारचा लस वाटपातील हा पक्षपात केवळ महाराष्ट्रापुरता नाही. भाजपशासित राज्यांना अधिक तर अन्य राज्यांना कमी लस देण्यात येत आहेत. यासंदर्भातील बोलकी आकडेवारीच समोर आली आहे. येत्या १५ ते २० एप्रिल या पाच दिवसात कोणत्या राज्याला किती लस द्यायच्या, याचे नियोजन केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे. ती यादी हाती आली आहे. भाजपची सत्ता ज्या राज्यांत आहे, तेथे रुग्ण संख्या किती, लोकसंख्या किती याचा कोणताही आढावा न घेता त्या राज्यात मोठ्या प्रमाणात लस पुरवण्याचे नियोजन आहे,  तर ज्या राज्यात विरोधी पक्षांची सत्ता आहे त्या राज्यांची लोकसंख्या आणि त्यांना दिलेले डोस पाहिले तर केंद्राने लस वाटपात केलेला पक्षपात स्पष्टपणे समोर येत आहे. भाजपशासित राज्यांना मिळणारे डोस : (१५ ते २० एप्रिल)राज्य    लोकसंख्या    किती डोस मिळणारउत्तरप्रदेश    १९.९५ कोटी    ४४,९८,४५०मध्य प्रदेश    ७.२५ कोटी    ३३,७६,२२०कर्नाटक    ५.२८ कोटी    २९,०६,२४०हरियाणा    २.५३ कोटी    २४,६८,९२०गुजरात    ६.८६ कोटी    १५,५७,८७०भाजपशासित नसलेल्या राज्यांना मिळणारे डोसराज्य    लोकसंख्या     किती डोस मिळणारमहाराष्ट्र    ११.२३ कोटी    १७,४३,२८०आंध्रप्रदेश    ४.९३ कोटी    १०,५८,१७०छत्तीसगड    २.७९ कोटी    ६,८४,२९०केरळ    ३.१८ कोटी    ४,७४,७१०राजस्थान    ६.८६ कोटी    ३,८३,२६०कोणत्या राज्यात किती टक्के वॅक्सिंन वाया गेले? (अधिकृत आकडेवारी नुसार)तेलंगणा -     १७.५%आंध्र प्रदेश -     ११.५%उत्तर प्रदेश -     ९.४%कर्नाटक -     ६.९%जम्मू काश्मीर -     ६.५%राजस्थान -     ५.६%आसाम -     ५.५%गुजरात -     ५.३%पश्चिम बंगाल -     ४.१%महाराष्ट्र -     ३.२%वरील आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या लसीवरून ३.२% वेस्टेज इतर राज्यांच्या तुलनेने फार कमी आहे.दररोज ३४ लाख लोकांचे लसीकरण; मोहीम एका दृष्टिक्षेपात देशात दररोज सरासरी ३४ लाख ३० हजार ५०२  लसींचे डोस दिले जात आहेत. आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले की, आतापर्यंत सरासरी ९ कोटी ०१ लाख ९८ हजार ६७३ डोस देण्यात आलेआहेत. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच कोरोनायोद्धे आणि ६० वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याचे ठरले.७ एप्रिल रोजी देशव्यापी लसीकरण मोहिमेला ८२ दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत झालेले लसीकरण९,०१,९८,६७३६० वर्षांपुढील व्यक्तींनी घेतलेला पहिला डोस३,६३,३२,८५१६० वर्षांपुढील व्यक्तींनी घेतलेला दुसरा डोस ११,३९,२९१गेल्या २४ तासांत वितरित करण्यात आलेले डोस३४,३०,५०२४५ ते ६० वर्षे, पहिला डोस२,३६,९४,४८७४५ ते ६० वर्षे वयाच्या व्यक्तींचा  दुसरा डोस४,६६,६६२ 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपा