CoronaVIrus News: धक्कादायक! ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सुलभ शौचालयात केलं क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 02:43 PM2021-04-29T14:43:31+5:302021-04-29T14:44:47+5:30

CoronaVIrus News: प्रशासनाचा संवेदनाशून्य कारभार; पाच कोरोना पॉझिटिव्ह मजुरांना शौचालयात ठेवलं

CoronaVIrus News 5 corona positive patients Quarantined in toilet in himachal pradesh | CoronaVIrus News: धक्कादायक! ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सुलभ शौचालयात केलं क्वारंटाईन

CoronaVIrus News: धक्कादायक! ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सुलभ शौचालयात केलं क्वारंटाईन

Next

पांगी: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून दररोज ३ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद आहे. यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आला असून अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत आहे. कोरोना रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यानं, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत असल्यानं त्यांचे प्राण गेल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत.

धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी! भाजप आमदाराचा कोरोनानं मृत्यू; मुलाकडून सरकारचे वाभाडे
 
कोरोना संकटात कुठे माणुसकीची उदाहरणं पाहायला मिळत असताना संवेदनशून्य कारभाराच्या प्रत्यय देणाऱ्या घटनादेखील समोर येत आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात असलेल्या पांगीमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. कोरोना झालेल्या पाच मजुरांना पांगी प्रशासनानं सुलभ शौचालयात क्वारंटिन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

कोरोना महामारीचा फटका; चार धाम यात्रा रद्द, 14 मेरोजी होणार होती सुरुवात

पांगीत काम शोधण्यासाठी आलेल्या काही मजुरांची बस आगारात कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर या मजुरांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना बस आगाराजवळ असलेल्या सुलभ शौचालयात क्वारंटाईन करण्यात आलं. मजुरांना शौचालयात ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर येताच एकच खळबळ माजली. मजुरांना बस आगाराजवळच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.

या प्रकरणाची दखल चंबा भागाचे सीएमओ डॉ. कपिल शर्मा यांनी घेतली आहे. कोरोना नियमांचं पालन करून मजुरांची सोय करा, त्यांना उपचार द्या, असे आदेश शर्मांनी बीएमओला दिले आहेत. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचनादेखील शर्मांनी दिल्या आहेत.

Web Title: CoronaVIrus News 5 corona positive patients Quarantined in toilet in himachal pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.