CoronaVirus News : देशभरात कोरोनाचे ४६,२५४ नवे रुग्ण; ५१४ जणांचा मृत्यू; ५ लाख सक्रिय रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 06:34 IST2020-11-05T06:34:02+5:302020-11-05T06:34:31+5:30
CoronaVirus News : सध्या देशभरात ५ लाख ३३ हजार ७८७ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या २ ऑगस्टनंतर प्रथमच साडेपाच लाखांच्या खाली आली आहे. तर आतापर्यंत ७६ लाख ५६ हजार ४७८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

CoronaVirus News : देशभरात कोरोनाचे ४६,२५४ नवे रुग्ण; ५१४ जणांचा मृत्यू; ५ लाख सक्रिय रुग्ण
नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६,२५४ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ८३ लाख १३ हजार ८७७ वर पोहोचली आहे. दिवसभरात कोरोनामुळे देशात ५१४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १ लाख २३ हजार ६११ झाली आहे.
सध्या देशभरात ५ लाख ३३ हजार ७८७ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या २ ऑगस्टनंतर प्रथमच साडेपाच लाखांच्या खाली आली आहे. तर आतापर्यंत ७६ लाख ५६ हजार ४७८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोना संसर्गात भारत जगभरात दुसऱ्या स्थानी आहे. तर अमेरिका प्रथम स्थानी आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण ९३,७९,६०० रुग्ण आढळले आहेत.
देशातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९२.०९ टक्के
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९२.०९ टक्क्यांपर्यंत पोहोचले. तर नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३.८२ टक्के इतके आहे. मृत्यूदरही १.४८ इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले.